Bats : ...यामुळे वटवाघुळे झाडांवर उलटी लटकतात; वाचा यामागचं नेमकं कारण
वटवाघुळांना तुम्ही अनेकदा बंद विजेच्या तारांवर, बिल्डींगच्या टेरेसवर किंवा झाडांवर उलटं लटकताना पाहिलं असेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया वटवाघळांची सर्वात मोठी आणि अनोखी गोष्ट म्हणजे ते उलटे लटकतात. वटवाघळांचं नाव घेताच क्षणी आपल्याला उलटी लटकणारी वटवाघळं डोळ्यांसमोर उभी राहतात.
पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की वटवाघळं नेहमी उलटी का लटकतात? नसेल तर आज आम्ही तुम्हाला वटवाघळांशी काही महत्त्वाच्या आणि रंजक गोष्टी सांगणार आहोत.
वटवाघुळं उलटी लटकण्यामागचं कारण म्हणजे ते उलटे राहून सहज उडू शकतात. खरंतर, वटवाघुळं इतर पक्ष्यांप्रमाणे जमिनीवरून उडू शकत नाहीत.
आकाशात उडण्यासाठी जेवढी उचल गरजेची असते त्यांचे पंख तेवढी उचल देऊ शकत नाहीत. याशिवाय त्यांचे मागचे पाय लहान आणि अविकसित असतात. त्यामुळे ते धावतानाही वेग पकडू शकत नाहीत.
अर्थातच वटवाघळांना पंख असतात आणि ते पक्ष्यांप्रमाणे आकाशात उडतात. पण प्रत्यक्षात ते पक्षी नसून उडणारे सत्सन प्राणी आहेत.
खरंतर, वटवाघुळं अंडी न देता थेट बाळांना जन्म देतात आणि आपल्या बाळांना स्तनपानही करतात. त्यामुळे ते पक्ष्यांच्या श्रेणीत येत नाहीत.
जगात वटवाघळांच्या एक हजारांहून अधिक प्रजाती आहेत. ज्यामध्ये फ्लाइंग फॉक्स प्रजातीची वटवाघळं सर्वात मोठी आहेत. फ्लाइंग फॉक्स वटवाघळांच्या शरीराची लांबी 40 सेमीपर्यंत असते.
काही वटवाघुळं इतर प्राण्यांचे रक्त पिऊन जगतात. अशा वटवाघळांना व्हँपायर बॅट म्हणतात.