Garlic for Hair : केस गळणे, केस तुटणे अशा सर्व समस्यांवर लसूण आहे फायदेशीर; फरक पाहून व्हाल हैराण
Garlic for Hair Growth : जर तुम्ही केस गळतीमुळे त्रस्त असाल तरीही तुम्ही केसांना लसणाचा रस लावून पाहा, तुमची समस्या नक्की दूर होईल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलसणाच्या वापरामुळे केसगळतीपासून सुटका मिळेल. लसणामधील गुणधर्म केसगळती रोखण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.
लसणाचा रस वापरल्यामुळे केसातील कोंडा दूर होईल. कोंड्याच्या समस्येवरही लसूण हा उत्तम उपाय आहे. लसणाचा रस केसांना लावल्याने त्याचा खूप फायदा होतो.
लसणाचा रस लावल्याने टाळू आणि केसांमध्ये जमा झालेला कोंडा दूर होतो आणि खाज येण्याची समस्याही दूर होते.
लसणाचा वापर केल्यावर केस रुक्ष होण्याची समस्याही दूर होते. सूर्यप्रकाशाच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेप्रमाणेच केसांनाही हानी पोहोचवतात.
हानिकारक युव्ही किरणांमुळे केसांमधील नैसर्गिक केरेटीन प्रोटीनही हळूहळू कमी होते, ज्यामुळे केस वाळतात.
यावर उपाय म्हणून तुम्ही केसांवर लसणाचा रस वापरु शकता. त्यामुळे केसांचे संरक्षण होते आणि कोरड्या केसांची समस्या दूर होऊन केस मजबूत आणि चमकदार होतील.
लसणात अशी अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात केसांची वाढ होण्यास खूप मदत होते. लसणाचा रस केसांना लावल्यास केसांची वाढ झपाट्याने होते. त्यामुळे केसांच्या वाढीसाठी लसूण खूप उपयोगी आहे.
लसणाचा रस तयार करण्यासाठी लसणाच्या काही पाकळ्या घ्या आणि त्या सोलून घ्या. आता लसणाच्या पाकळ्या मिक्सरमध्ये वाटून बारीक पेस्ट तयार करा. आता हा रस गाळून घ्या.
एका वाटीत एक चमचा लसणाचा रस, एक चमचा नारळाचं तेल किंवा ऑलिव्ह ऑईल मिसळा आणि हे मिश्रण चांगलं एकजीव करा. आता हे तेल टाळूला आणि केसांना लावा. 15 मिनिटे ते 20 मिनिटे ठेवून त्यानंतर केस शॅम्पूने धुवा. काही दिवसात याचा वापर करुन तुम्हाला फरक जाणवेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.