श्रीक्षेत्र आदमापुरात भंडाऱ्याची मुक्त उधळण; 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'च्या जयघोषात बाळूमामांचा रथोत्सव सोहळा उत्साहात
बाळूमामा भंडारा उत्सवातील महाप्रसादासाठी 18 बग्गीतील मेंढ्यांच्या दुधाच्या घागरी बाळूमामाच्या रथातून विधीपूर्वक आदमापूरकडे नेण्याचा कार्यक्रम कागल तालुक्यातील निढोरीत पार पडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावर्षी बाळूमामाच्या रथास ओढण्याचा मान पुण्यातील रावेतच्या नंदकुमार शेवाळे वाल्हेकर वाडी दत्तात्रय भोंडवे यांच्या बैल जोडीला मिळाला.
बाळूमामांच्या भंडारा उत्सवामध्ये खिरीचा प्रामाप्रसाद महत्त्वाचा कार्यक्रम मानला जातो.
बाळूमामा स्वतः मेंढ्यांच्या दुधाची घागर महाप्रसादामध्ये वापरायचे, तीच प्रथा आजही कायम आहे.
महाराष्ट्रासह सहलगतच्या विविध राज्यांमध्ये बाळूमामांनी जतन केलेल्या सुमारे 30 हजार बकऱ्यांचे 18 ठिकाणी कळप आहेत.
बाळूमामांनी सुरू केलेल्या प्रथेनुसार भंडाऱ्याच्या निमित्ताने महाप्रसादाच्या आदल्या दिवशी हे सर्व कळप निढोरीत एकत्र आणले जातात.
या कळपातील मेंढ्यांच्या दुधाने भरलेल्या घागऱ्यांची भाविकांनी स्वागत केले. फुलांनी सजविलेल्या रथात विधीपूर्वक या दुधाच्या घागरी ठेवण्यात आल्या.
येथूनच बाळूमामांनी आपल्या भक्ताकडे सुपूर्द केलेल्या घागरीसह अन्य कळपातील दुधाच्या घागरी मानाच्या बैलगाडीतून रथासह आदमापूरकडे रवाना झाल्या.
द्वादशीला सकाळी मानाच्या घागरीतून बाळूमामांना दुग्धाभिषेक घालण्यात येणार आहे. उर्वरित मेंढ्यांचे दूध महाप्रसादामध्ये वापरले जाणार आहे.
रथोत्सवाच्या दोन किलोमीटर मार्गावर भक्तांनी जेसीबीतून भंडाऱ्याची उधळण केली. भंडाऱ्याची मुक्त उधळण करीत बाळूमामाच्या नावानं चांगभलं चा जयघोष करण्यात आला.