Ganesh Chaturthi 2024 Prasad : आधी वंदू तुज मोरया..! लाडक्या बाप्पाला 10 दिवस 10 प्रिय प्रसाद करा अर्पण, सगळेच होतील खूश
मोदक लाडू- मोदकांचे लाडू गणेशजींना अतिशय प्रिय आहेत. मोदकही अनेक प्रकारात बनवले जातात. महाराष्ट्रात विशेषत: गणेशपूजेच्या निमित्ताने प्रत्येक घरात वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले जातात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपायसम - ही देखील पारंपारिक दक्षिण भारतीय खीर आहे. हे दूध आणि साखर किंवा गूळ घालून बनवले जाते, नंतर त्यात तांदूळ किंवा शेवया घालतात. शेवटी वेलची पावडर, तूप आणि इतर ड्रायफ्रुट्स चवीनुसार आणि सजावटीसाठी जोडले जातात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही भात किंवा साबुदाण्याची खीरही बनवू शकता.
मोतीचूर लाडू - मोदकानंतर मोतीचूर लाडू देखील नैवेद्य म्हणून दिला जातो. त्यांना बुंदीचे लाडू असेही म्हणतात. याशिवाय शुद्ध तुपाने बनवलेले बेसनाचे लाडूही बाप्पाला आवडतात. तीळ आणि रव्याचे लाडूही बाप्पाला अर्पण केले जातात.
नारळ भात - हे दक्षिण भारतात बनवले जाते. नारळाच्या दुधात किंवा पाण्यात तांदूळ भिजवून किंवा भातामध्ये नारळाचे दूध, किस मिसळून ते शिजवून बनवले जाते.
साटोरी किंवा पुरण पोळी - खवा किंवा मावा, तूप, बेसन आणि दुधापासून बनवलेला हा महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. पुराण पोळीच्या सारणात डाळीत गूळ मिसळला जातो, नंतर तो चपातीमध्ये भरला जातो. ज्याप्रमाणे बटाट्याचा पराठा बनवला जातो, त्याच पद्धतीने ही पुरण पोळी बनवली जाते.
शुद्ध तूप आणि गूळ - शुद्ध तुपात मिसळलेला स्थानिक गूळही देतात. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास तुम्ही चतुर्थीच्या दिवशी गणेशाला खजूर, परमल, नारळ आणि साखरेचा प्रसाद देऊ शकता.
श्रीखंड- केशरमिश्रित पिवळे श्रीखंडही गणेशाला अर्पण केले जाते. दह्यापासून बनवलेल्या या गोडामध्ये बेदाणे आणि चारोळी मिसळा आणि त्याचा आनंद घ्या. श्रीखंडाव्यतिरिक्त तुम्ही पंचामृत किंवा पंजरी देखील देऊ शकता.
रवा पोंगल - रव्यात तूप टाकून बनवले जाते, म्हणजे रवा आणि मूग. त्यात बेदाणे, काजू आणि बदाम टाकले जातात. याशिवाय तुम्हाला हवं असल्यास रव्याचा हलवाही देऊ शकता.
केळी शिरा - मॅश केलेली केळी, रवा आणि साखरेपासून बनवलेला शिरा अप्रतिम आहे. हा पदार्थही देखील गणपतीचा आवडता मानला जातो. बाप्पाला केळीचा प्रसादही खूप आवडतो. हा केळीचा प्रसाद हत्तीलाही खाऊ घालावा.
शमीची पाने आणि दुर्वा - अन्नासोबतच श्रीगणेशाला शाभीची पाने आणि दुर्वाही अर्पण केल्या जातात. त्याला आवडत्या प्रसादासोबत 21 दुर्वा अर्पण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. गणेशजींना शमीही खूप प्रिय आहे. श्रीगणेशाला शमीची काही पाने नियमित अर्पण केल्यास घरात धन-समृद्धी वाढते. जर तुमच्या आयुष्यात खूप समस्या असतील तर गणेश चतुर्थीच्या दिवशी हत्तीला हिरवा चारा खायला द्या.