सकाळी चाला किंवा संध्याकाळी, रोज 30 मिनिटं चालल्यानं शरिरात दिसतील 'हे' बदल
मॉर्निंग वॉक असो की सायंकाळचा फेरफटका शरिराला रोज चालणं अतिशय आवश्यक आहे. यासाठी कोणत्याही उपकरणाची गरज नाही
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरोज अर्धा तास चालल्यानं हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊन पाठीच्या खालच्या भागाचा व्यायाम होतो. परिणामी तंदुरुस्ती राहते.
सामान्य गतीच्या थोडं अधिक स्पीडनं सलग अर्धा तास चालल्यानं त्या व्यक्तीच्या शरिरातील 150 कॅलरिज बर्न होतात.
चालणं केवळ वजनासाठीच नाही तर मुड सुधारण्यासाठीही तेवढंच महत्वाचं समजलं जातं. मानसोपचार तज्ञांच्या मते, नियमित चालल्यानं नैराश्य आणि चिंता कमी होते.
अर्धा तास रोज चालल्यानं पचनास मदत होऊन पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. बद्धकोष्ठता, पोट फुगणे यासह पचनाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.
नॅशनल इंन्स्टिट्यूट ऑफ आर्थ्ज्ञराईटटिस अँड मस्कुलोस्केलेटल अँन्ड स्कीन डिसेजच्या मते, चालणं, वजनं उचलणे यानं स्नायु बळकट होत हाडांची घनता सुधारण्यास मदत मिळते.