Ganesh Chaturthi Rangoli : बाप्पाची सुंदर प्रतिमा, आकर्षक फुलांच्या माळा; लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी घरच्या घरी काढा 'या' सुंदर रांगोळ्या
उद्यापासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. घरोघरी बाप्पाचं आगमन होणार आहे. दहा दिवस चालणारा गणपती उत्सव देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. जर तुम्हीही तुमच्या घरी गणपती बाप्पाचे स्वागत करणार असाल तर घराची सजावट करणे खूप गरजेचे आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appघराच्या उंबरठ्यावर तुम्ही फुलांच्या पाकळ्यांनी घर सजवू शकता आणि घराच्या उंबरठ्यावर रांगोळी डिझाईन काढून घर सुंदर सजवू शकता. चला तर अशाच काही सोप्या रांगोळी डिझाईन्स पाहूयात.
ही रांगोळी दिसायला तितकीच सुंदर आणि बनवायलाही तितकीच सोपी आहे. यामध्ये तुम्ही फक्त रांगोळीच्या रंगांनी श्री आणि गणपती बाप्पाची प्रतिमा बनवू शकता आणि फुलांनी सजवू शकता.
गणेश चतुर्थीला तुम्ही ही सोपी रांगोळी काढू शकता. यामध्ये फारशी मेहनत नाही. ही डिझाईन तुम्ही फक्त दोन-तीन रंगांनी बनवू शकता.
रांगोळी काढताना योग्य जागा निवडणे महत्त्वाचे आहे. वारा नसलेल्या ठिकाणी रांगोळी काढा, कारण रंग हलके असतात आणि वाऱ्यामुळे रांगोळी खराब होण्याची शक्यता असते.
लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी तुम्ही अगदी साधी आणि सोपी रांगोळी देखील काढू शकता. शिवाय ही रांगोळी दिसायलाही सुंदर दिसते. यासाठी तुम्हाला फक्त 3 रंगांची आवश्यकता असते.
जरी तुम्ही रांगोळी काढण्यात कुशल नसलात तरी तुम्ही गणपती बाप्पाच्या काही सोप्या रांगोळीच्या डिझाईन्स अगदी सहज बनवू शकता. कारण त्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत नाही.
तुमच्या घरी गणपतीचं आगमन होणार असेल तर बाप्पाच्या स्वागतासाठी तुम्ही बाप्पाची रांगोळी काढू शकता. या प्रकारच्या रांगोळीमध्ये गणपती बनवला जातो आणि त्याबरोबर विविध प्रकारच्या डिझाईन्सचा समावेश केला जातो.
रंगांऐवजी रंगीबेरंगी फुलांनी रांगोळी काढायची असेल तर काही खास कल्पना वापरू शकता. यासाठी तुम्हाला गुलाबाच्या फुलांच्या पानांसह इतर काही फुलांची पाने गोळा करावी लागतील. यासाठी तुम्हाला फक्त ताजी फुले आणि डिझाईन एक प्लेट आणि वाटी लागेल. अशाप्रकारे, तुमच्या घराच्या दारात एक छान फुलांची रांगोळी तयार होईल.