Fashion : दिसशी सौंदर्यवती तू..! सिल्क साडीपासून बनतील असे ड्रेस, लोक करतील कौतुक
साडी म्हटलं म्हणजे महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय..! क्वचितच अशी एखादी स्त्री असेल जिला साडी नेसायला आवडणार नाही. आजकाल प्रत्येक वयोगटातील महिला आणि मुलींकडे साड्यांचे कलेक्शन असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजर आपण सिल्क आणि बनारसी साड्यांबद्दल बोललो तर या साड्या नेहमीच एव्हरग्रीन असतात. सर्व प्रकारच्या इव्हेंटमध्ये सिल्क आणि बनारसी साडी नेसता येते. या साड्या अशा आहेत की त्या वर्षानुवर्षे खराब होत नाहीत.
जर तुमच्याकडेही सिल्क आणि बनारसी साड्यांचे अप्रतिम कलेक्शन असेल पण तुम्हाला त्या नेसण्याचा कंटाळा आला असेल, तर आम्ही तुम्हाला त्यातून काही स्टायलिश आउटफिट्स बनवण्याची कल्पना देणार आहोत.
इंडो वेस्टर्न ड्रेस - जर तुम्ही सिल्क साडीपासून काही इंडो वेस्टर्न बनवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. एम्ब्रॉयडरी केलेल्या सिल्क साडीपासून तुम्ही असा ड्रेस बनवू शकता.
अनारकली सूट - साडीपासून बनवलेला अनारकली सूट हा प्रकार खूपच क्लासी दिसतो. गडद रंगाच्या सिल्क साडीने असा अनारकली सूट तुम्ही स्वतःसाठी बनवू शकता. तुम्ही ते कोणत्याही कार्यक्रमात घालू शकता.
प्लाझो कुर्ता - जर तुम्ही सिल्क साडीपासून काही क्लासी बनवण्याचा विचार करत असाल तर हा एक चांगला पर्याय आहे. सिल्क साडीपासून कुर्ता बनवून तुम्ही मॅचिंग पलाझो बनवू शकता.
को-ऑर्ड सेट - आजकाल मुलींना को-ऑर्ड सेट खूप आवडतात. हे दिसायलाही खूप स्टायलिश आहेत. त्यामुळे तुमची किंवा तुमच्या घरात कोणाची सिल्कची सुंदर साडी असेल तर तुम्ही अशा प्रकारचा को-ऑर्ड सेट करून घेऊ शकता.
अंगरखा सूट - साडीपासून बनवलेला हा प्रकार अतिशय सुंदर दिसतो. असा सूट तुम्ही सिल्क साडीपासून बनवू शकता. यासोबतच त्याचा मॅचिंग दुपट्टा आणि पायजमा याची खात्री करा.