Dombivli Indo Mines Company Blast : डोंबिवलीकरांची धाकधूक वाढली, महिन्याभरातच MIDC मध्ये दुसरा भीषण स्फोट, आसपासच्या परिसरात आगीचे लोळ, हादरवणारे फोटो
Dombivli Blast in Indo Mines Company Latest Updates: डोंबिवली-एमआयडीसीतील एका कंपनीला भीषण आग लागली आहे. साधारणतः महिन्याभरातच स्फोटाची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे डोंबिवलीकरांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडोंबिवलीतील इंडो अमाइन्स या कंपनीत मोठा स्फोट झाला असून भीषण आग लागली आहे. स्फोटांचे मोठे आवाज ऐकू येत असल्यानं आसपासच्या परिसरातील रहिवाशांमध्ये भितीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
डोंबिवलीतील एमआयडीत इंडो-अमाईन्स ही कंपनी आहे. या कंपनीत पेस्टीसाईड्स बनवले जातात. याच कंपनीत आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
सध्या अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे.
एमआयडीसीतील इंडो-अमाईन्स कंपनीत आग लागल्यानंतर जवळच असलेल्या अभिनव शाळेतील विद्यार्थ्यांनी घरी पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. आग एवढी भीषण आहे की, आगीचे लोळ पाहून परिसरात राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.
आजूबाजूच्या परिसरातील कारखान्यातील कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे.
साधारणतः 15 दिवसांपूर्वीच डोंबिवली एमआयडीत एक मोठा स्फोट झाला होता. यामध्ये तब्बल 20 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता.
image 9अशातच साधारणतः महिन्याभरातच डोंबिवली एमआयडीसीत दुसरा भीषण स्फोट झाल्यानं डोंबिवलीकरांमध्ये भितीचं वातावरण दिसून येत आहे.
इंडो-अमाईन्स कंपनीच्या आजूबाजूच्या कंपन्यांनी तात्काळ आपल्या सर्व कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढलं आहे. तसेच, स्फोट झालेल्या इंडो-माईन्स कंपनीत कोणी कामगार अडकलेत का? याची चाचपणी प्रशासनाकडून सुरू आहे.