Fashion : सुगंधी परफ्यूम लावताय? पण सांभाळून.. शरीराच्या 'या' भागांवर कधीही परफ्यूम लावू नका, समस्या उद्भवू शकतात
Fashion : अनेकजण परफ्युमचे शौकीन असतात. सुगंधी वास येण्यासाठी आजकाल प्रत्येकजण परफ्यूम वापरतो. काही लोक असे आहेत, ज्यांच्याकडे परफ्यूमचे वेगवेगळे कलेक्शन असते. त्यामुळे त्यांना विविध परफ्यूमचे ब्रँड आणि त्याच्या सुगंधाची चांगली माहिती असेल. पण कदाचित तुम्हाला हे माहित नसेल, की काही भागांवर परफ्यूम लावता येत नाही. आणि जर तुम्ही असे करत असाल, तर त्याचा नक्कीच त्रास होऊ शकतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडोळ्यांजवळ लावणे टाळा आपल्या डोळ्याभोवतीची त्वचा अतिशय नाजूक आणि संवेदनशील असते. डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा अतिशय पातळ असते. डोळ्यांखालील भागावर काळी वर्तुळे ते बारीक रेषांपर्यंतच्या खुणा प्रथम दिसतात. अशा परिस्थितीत या भागाला विशेष काळजी घेण्याची गरज आहे. जर तुम्ही काळजी घेत असाल तर केमिकलयुक्त परफ्यूम डोळ्यांजवळ लावू नका. फॅशनमुळे परफ्यूम वापरणारे अनेक लोक आहेत, पण असे करणे चुकीचे आहे.
अंडरआर्म्समध्ये परफ्यूम अजिबात लावू नका अंडरआर्म्सवर परफ्यूम लावल्याने दिवसभर दुर्गंधी येत नाही असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही चुकीचे आहात. असे करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते, यामुळे केवळ जळजळच नाही तर पुरळ उठणे तसेच त्वचा काळी देखील पडू शकते. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही तुमच्या कपड्यांवर परफ्यूम लावलात तर उत्तम.
योग्य ठिकाणी परफ्यूम लावा मनगट, मान आणि छाती यांसारख्या भागांवर परफ्यूम लावण्याची खात्री करा. ही अशी ठिकाणे आहेत जिथे तुमच्या त्वचेतून उष्णता निघून जाते. अशात शरीराच्या या अवयवांजवळ परफ्युम लावल्यास सुगंध पसरण्यास मदत होते. केसांमधले परफ्यूम म्हणजे तेल जे परफ्यूमप्रमाणे तासन् तास सुगंधित राहतात. त्याचा सुगंध दिवसभर तुमच्या केसांमध्ये राहील आणि उन्हाळ्यात शरीरातील घामाच्या वासापासून मुक्त होण्यास मदत होईल.
कानाभोवती परफ्यूम लावू नका कानात परफ्यूम लावल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. कारण परफ्यूममध्ये अल्कोहोल आणि इतर अनेक रसायने असतात, ज्यामुळे कानाच्या त्वचेला जळजळ होऊ शकते. याव्यतिरिक्त, कानात परफ्यूम लावल्याने संसर्गाचा धोका वाढू शकतो, कारण रसायने कानाच्या आतील त्वचेला इजा करू शकतात. त्यामुळे कानात कधीही परफ्यूम लावू नये. जर तुम्हाला कानाजवळ सुगंध वापरायचा असेल तर तुम्ही कानामागील त्वचेवर परफ्यूम लावू शकता. यामुळे सुगंधही कायम राहतो आणि कोणत्याही प्रकारची आरोग्य समस्या होण्याचा धोका नाही.
तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ करा तुमचा परफ्यूम जास्त काळ टिकण्यासाठी, सर्वप्रथम तुमची त्वचा मॉइश्चरायझेशन ठेवणे महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात परफ्यूम लावण्यापूर्वी तुम्ही तुमच्या त्वचेवर जेल-आधारित लाइट मॉइश्चरायझर वापरू शकता. हायड्रेटेड त्वचेवर मॉइश्चरायझर लावल्याने परफ्यूम तासन्तास टिकू शकतो.
आजकाल परफ्यूम घालणे हा देखील फॅशनचा एक भाग मानला जातो. शरीरावर काही ठिकाणी याचा वापर करणे त्रासाचे कारण बनू शकते.