Health Tips: ही फळे सोलून खाण्याची चूक करू नका, नाहीतर..
फळे हे आरोग्यदायी गोष्टींपैकी एक आहेत. जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि फायबर यांसारख्या औषधी गुणधर्मांनी समृद्ध फळे पूर्णपणे फायदेशीर आहेत. फळे खाणे जितके आवश्यक आहे, तितकेच फळे खाण्याची योग्य पद्धत जाणून घेणे देखील आवश्यक आहे. फळे चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यास पूर्ण पोषण मिळत नाही. काही लोक फळे सोलून खातात. पपई, टरबूज यांसारख्या फळांसाठी हे ठीक आहे, पण काही फळांच्या सालींमध्ये पौष्टिकतेचा खजिना दडलेला असतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकिवी हे अतिशय आरोग्यदायी फळ आहे. त्याची साल देखील खूप फायदेशीर आहे.
किवीची साल कठिण असते, त्यामुळे बरेच लोक ती फेकून देतात. याच्या सालीमध्ये जीवनसत्त्वे आणि अनेक खनिजे असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
पीच हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पीचच्या सालीमध्येही अनेक आरोग्यदायी पोषक घटक असतात.
पीचच्या सालीमध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते. हे हृदय आणि पाचन तंत्रासाठी खूप फायदेशीर आहे.
सफरचंद जवळपास प्रत्येक आजारात खाल्लं जातं. सफरचंद सोलून खाणे अनेकांना आवडते, परंतु असे करणे योग्य नाही.
सफरचंदाच्या सालीमध्ये असलेले पोषक तत्व रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. सफरचंदाची साल हृदयासाठीही फायदेशीर असते.
बहुतेक लोकांना चिकू सोलून खाणे आवडते. जरी त्याची साल काढणे कठीण आहे, परंतु नंतर लोक ते खाण्यात काही अर्थ नाही असे समजून चिकूची साल फेकून देतात.चिकूची साल अनेक रोगांवर फायदेशीर आहे.
नाशपाती फळासोबत सालीचेही सेवन करावे. नाशपातीच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
नाशपातीची साल हृदयासाठी फायदेशीर असते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.(सर्व फोटो सौजन्य :unsplash.com)