PHOTO: ‘ही’ फळं शरीरातील प्रोटिनची कमतरता भरून काढतात; वाचा सविस्तर!
नियमितपणे फळं खाणं शरीरासाठी उपयुक्त ठरतं. केवळ प्रोटिन नाही तर शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्याचं कामही फळांमुळे होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएक कप कच्च्या ब्लॅकबेरींमध्ये 2 ग्रॅम प्रोटिन असतं. तसंच शरीरातील फायबर्सची झालेली झीजही भरून निघते.व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंटसचं प्रमाणही ब्लॅकबेरीमध्ये आढळतं. यामुळे तुमची त्वचा चांगली व तजेलदार राहते
केळ्यांमध्ये पोटॅशियमचं प्रमाण खूप असतं. एक कप केळ्यांच्या ज्युसमध्ये 1.6 ग्रॅम इतकं प्रोटिन असतं.
या शिवाय केळ्यात फायबर, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, बी 6 आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळतं.
शरीरातील प्रोटिनची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात केळ्यांचा समावेश करायला हवा.
एक कप किवीमध्ये 2 ग्रॅम प्रोटिन असतं.
शरीरातील आयर्नची कमतरता भरून काढण्यासाठीही डाएटमध्ये किवी असणं फायद्याचं ठरतं.
एक कप चेरीमध्ये 1.6 ग्रॅम प्रोटिन असतं. तसंच यात ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी उपयुक्त असं पोटॅशियमही आढळतं.
चेरीपासून तयार केलेली स्मूदी खाणं ही शरीरासाठी उपयुक्त ठरतं.
एक कप पेरूच्या ज्युसमध्ये 4.2 ग्रॅम इतकं प्रोटिन असतं.
पेरूमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर यांचे प्रमाण खूप असते. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (सर्व फोटो सौजन्य : unsplash.com)