तुम्ही केस सुकवण्यासाठी हेअर ड्रायर वापरता का? जाणून घ्या हेअर ड्रायरचे साइड इफेक्ट!
हिवाळ्यात केस कोरडे करण्यासाठी किंवा केशरचना करण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appओल्या केसांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी जवळजवळ प्रत्येक घरात याचा वापर केला जातो. हेअर ड्रायर वापरल्याने तुमच्या केसांच्या नैसर्गिक सौंदर्यावर वाईट परिणाम होतो.
यामुळे तुमचे केस खडबडीत आणि कोरडे होऊ शकतात आणि अनेक प्रकारे खराब होऊ शकतात.
हेअर ड्रायरमधून बाहेर पडणारी हवा आपल्या डोळ्यांना खूप हानी पोहोचवते. यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ, खाज सुटणे, लालसरपणा आणि कोरडेपणा येतो.
जर तुम्ही रोज हेअर ड्रायर वापरत असाल तर त्यामुळे तुमच्या केसांमध्ये मेलेनिनची कमतरता निर्माण होऊ शकते, ज्यामुळे केसांच्या रंगावर परिणाम होतो. त्यामुळे केस पांढरे होऊ लागतात.
जर तुम्ही मॅट लिपस्टिक लावण्यासाठी हेअर ड्रायर वापरत असाल तर त्यामुळे तुमची त्वचा डिहाइड्रेटेड होऊ शकते.
हेअर ड्रायरच्या अतिवापरामुळेही स्प्लिट एन्ड्सची समस्या वाढते. याच्या वापरामुळे केसांमधील आर्द्रताही कमी होऊ लागते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.