Salt Intake Side Effects : तुम्ही पण जास्त मीठ खाता का? अति मीठ खाण्यामुळे होऊ शकतो किडनी स्टोन, जाणून घ्या यावरील उपाय
आजच्या काळात किडनी स्टोनची समस्या केवळ वृद्धांनाच नाही तर तरुणांमध्येही पाहायला मिळते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्याची लक्षणे लवकर समजत नाहीत. पण नंतर त्रास व्हायला सुरूवात होते.
त्याचबरोबर योग्य उपचार न केल्यास किडनी खराब होण्याचा धोकाही वाढतो.
चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींव्यतिरिक्त, जास्त मीठ खाल्ल्याने देखील किडनी स्टोनची समस्या उद्भवू शकते.
जास्त मीठ खाल्ल्याने किडनी स्टोनची समस्या उद्भवू शकते, कारण जास्त मीठ खाल्ल्याने लघवीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण वाढते, ज्यामुळे किडनी स्टोन होऊ शकतो.
एका दिवसात 2300 mg पेक्षा जास्त मीठ वापरू नये, तर 1500 mg मीठ किडनी स्टोनचा त्रास असलेल्या लोकांसाठी योग्य आहे.
ही समस्या टाळण्यासाठी दररोज भरपूर पाणी प्या.
कॅल्शियम युक्त पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला किडनी स्टोनची समस्या कधीच होणार नाही. दूध, दही, चीज, सोयाबीन, बदाम आणि हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्याने तुमच्या लघवीमध्ये कॅल्शियम जमा होण्याची शक्यता कमी होते. ज्यामुळे किडनी स्टोन होत नाही.
मांस, चिकन, अंडी आणि सीफूडचे जास्त सेवन करू नका. याच्या अतिसेवनाने शरीरातील युरिक ऍसिडचे प्रमाण वाढते आणि किडनी स्टोन होण्याचा धोका असतो.
चॉकलेट, चहा आणि अक्रोडाचे अतिसेवन केल्यानेही किडनी स्टोनचा धोका वाढतो.