Bandra Terminus : प्लॅटफॉर्म नंबर एक, 2500 लोक, भर रात्री वांद्र्यात रक्ताचा सडा; पावणेतीनच्या चेंगराचेंगरीची इनसाईड स्टोरी!
रविवारी सकाळी सव्वा पाच वाजता वांद्रे टर्मिनस ते गोरखपूर जाण्यासाठी अंत्योदय एक्सप्रेस सुटणार होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appही ट्रेन पूर्णतः अनारक्षित असते, त्यामुळे या ट्रेनमधून जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी प्लॅटफॉर्म नंबर एक वर झाली होती.
दिवाळी असल्याकारणाने उत्तर भारतात जाण्यासाठी उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात ट्रेनने प्रवास करत होते.
अंदाजे अडीच हजार लोक या एका ट्रेनसाठी प्लॅटफॉर्म नंबर एकवर जमले होते.
ट्रेन सुटण्याच्या बरोबर दोन तास आधी अंदाजे 2 वाजून 45 मिनिटांनी रिकामी 22 डब्यांची ट्रेन प्लॅटफॉर्मवर आणली जात होती. गाडीचे 16 डबे प्लॅटफॉर्मवर आले होते त्यामुळे गाडीचा वेग अतिशय कमी करण्यात आला.
त्याचवेळी या गाडीमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी दरवाजावर लटकण्यास सुरुवात केली.
त्यात एका प्रवाशाने इमर्जन्सी खिडकीमधून आत मध्ये जाण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला, हे पाहून इतर प्रवाशांनी देखील त्या खिडकीतून तसंच दरवाजातून आतमध्ये जाण्यासाठी गाडीच्या एका डब्या जवळ जास्त गर्दी केली. अशाप्रकारे एका मागे एक घटना घडत गेल्या आणि चेंगराचेंगरी झाली, ज्यात 7 जण जखमी, तर दोघे गंभीर जखमी आहेत.