Diwali 2022 Rangoli : दिवाळीत दारी काढा सुंदर आणि आकर्षक रांगोळी; पाहा फोटो
दिवाळीत अनेक प्रथांबरोबरच रांगोळीला देखील खूप महत्त्व आहे. अशा वेळी तुम्ही वेगवेगळ्या आणि आकर्षक रांगोळी काढू शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिवाळीत रांगोळी काढणं शुभ मानलं जातं. त्यामुळे तुम्ही रांगोळीत एखादी कलशच्या डिझाईनची रांगोळी काढू शकता.
रांगोळीची शोभा अधिक वाढते ती त्यातील दिव्यांनी. त्यामुळे तुम्ही कोणतीही रांगोळी काढली तरी त्यामध्ये दिवे लावायला विसरू नका.
दिवाळीत भिंतीच्या मध्यभागी तुम्ही रांगोळीची अशी सुंदर रचना करू शकता. ही रांगोळी काढण्यासही अगदी सोपी आहे.
दिवाळीला मोराच्या डिझाईनची रांगोळी देखील अनेकजण काढतात. ही रांगोळी दारात अगदी आकर्षक दिसते.
घराबाहेर किंवा ऑफिसमध्ये कुठेही गोल रांगोळी सुंदर दिसते. ही आकर्षक रांगोळी तुम्ही दिव्यांनी छान सजवू शकता.
दिवाळीत घरात खूप कामं असतात. अशा वेळी तुम्ही ही सुंदर आणि आकर्षक रांगोळी अगदी 10 ते 15 मिनिटांत काढू शकता.