मद्यप्रेमींनो, ब्रिटनची स्कॉच व्हिस्की भारतात मिळणार नाही!
भारतातला मोठ्या सणांपैकी एक असलेला दिवाळी सणात ब्रिटनचा स्कॉच व्हिस्की उद्योग मोठ्या दिवाळी सणााला मुकणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appब्रिटनमधील सत्तांतरानंतर करार हा लालफितीमध्ये अडकला आहे. यामुळे तिथल्या उत्पादकांना भारतात उद्योग विस्तारण्याची नामी संधी होती. परंतु त्यांचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे.
ब्रिटनच्या स्कॉच व्हिस्की उद्योगासाठीचा बहुप्रतिक्षित इंडो-यूके मुक्त व्यापार करार दिवाळीत पूर्ण होणार नाही हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे.
यूकेचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीच भारतासोबतच्या व्यापार करारासाठी दिवाळीची अंतिम मुदत निश्चित केली होती.
यूकेच्या नवीन व्यापार सचिव केमी बडेनोच त्या तारखेपर्यंत करार पूर्ण होणार नाही असं सांगत तारखेपेक्षा करारावर लक्ष केंद्रित करण्यावर भर असल्याचे म्हटले आहे.
भारतात दिवाळीदरम्यान दारुचा खप खूप जास्त असतो. प्रामुख्याने हा हंगाम कॅप्चर केल्याने स्कॉच व्हिस्की उद्योगाला मोठा व्यावसायिक फायदा होत असल्याचे आकडेवारीतून दिसून येते.
भारतीय व्हिस्कीचे उत्पादन एकूण स्कॉचव्हिस्की उत्पादनाच्या अडीच पट आहे.
स्कॉटिश डिस्टिलर्सना भारतात व्यवसाय करण्याची संधी दिली आहे. यासाठी करार होणं महत्त्वाचं होतं परंतु अद्याप कोणताही करार झालेला नाही असं स्कॉच व्हिस्की असोसिएशनचे सीईओ मार्क केंट यांनी सांगितले.
स्कॉच व्हिस्कीवरील 150 टक्के दर कमी करण्यासाठी भारतासोबत करार करणे हे उद्योगाचे सर्वोच्च आंतरराष्ट्रीय व्यापार प्राधान्य असल्याचे केंटने म्हटले आहे.
यूकेच्या गृहसचिव सुएला ब्रेव्हरमन यांच्या भारतीयांच्या व्हिसावर आणि त्यांच्या तिथल्या मुक्कामाबद्दल काही टिपण्ण्या केल्या होत्या. त्यामुळे वाटाघाटींच्यामध्ये अडथळे निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली