PHOTO: पुण्यात पावसाचं थैमान; दगडूशेठ मंदिर परिसरातही पाणीच पाणी!
राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुणे शहर आणि परिसरात काल म्हणजेच सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला मुसळधार पाऊस मध्यरात्री पर्यंत सुरू होता.
. पुण्यातील अनके भागात जोरदार पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरुप आल आहे.
पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात व मंदिरात देखील पाणी शिरलं आहे.
मंदिर प्रशासनाकडून रात्री उशीरापर्यंत पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते.
पुण्यात रस्त्यावर जमा झालेल्या पावसाच्या पाण्यातून वाट काढताना पुणेकरांची दमछाक झाली.
विशेषत: या पावसामुळे वाहतुकीवर मोठ्याप्रमाणात परिणाम झाला. अलका टॉकीज परिसरातील रस्त्यांनाही नदीचे स्वरुप आले होते. यात अनेक दुचाकी वाहून गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
याशिवाय श्रीमंत भाऊ रंगारी गणपती ट्रस्टच्या संग्रहायलातही पावसाचे पाणी शिरले, दरम्यान शहरातील अनेक भागात हीच स्थिती पाहायला मिळाली.(फोटो सौजन्य : व्हायरल व्हिडीओ)