Diabetes : मधुमेह असलेल्या लोकांनी 'या' पदार्थांचा आहारात समावेश करा, रक्तातील साखर नियंत्रणात राहील..
कडधान्य : मोड आलेल्या कडधान्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. कडधान्य रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात, त्यामुळे आपले वजन देखील नियंत्रणात राहते. (Photo Credit : pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंत्री : 'व्हिटॅमिन सी'ने समृद्धी पदार्थ आहे. नियमित संत्री खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. फळात साखर आणि कॅलरीजचे प्रमाण कमी असते. (Photo Credit : pixabay)
सुखामेवा : बदाम, अक्रोड , पिस्ता हे नट्स मधुमेहाच्या लोकांनी रोज खावे. भूक नियंत्रणात राहते आणि शरीरातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते. (Photo Credit : pixabay)
चेरी : चेरीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. कॅलरीजही कमी करतात. (Photo Credit : pixabay)
पालेभाज्या : हिरव्या पालेभाज्या मधुमेहाची समस्या असलेल्या लोकांसाठी रामबाण उपाय आहे. पालेभाज्यांमध्ये फायबर असते. नियमित जेवणात सॅलेडचा समावेश करावा त्यामुळे साखर नियंत्रित राहते. (Photo Credit : pixabay)
ओट्स : ओट्समध्ये बीटा कॅरोटीन असते , त्यामुळे साखर नियंत्रणात राहते. ओट्सचा नाश्ता रोज करावा. (Photo Credit : pixabay)
गव्हाचा ब्रेड : गव्हाचा ब्रेड हा फायबर समृध्द असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतो. तसेच बाजरीची भाकरीही मधुमेहाची समस्या असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे. (Photo Credit : pixabay)
गाजर : गाजर हे बीटा कॅरोटीन आणि पोटॅशियमने समुद्ध आहे. त्यात मोठ्या प्रमाणात फायबर असते, त्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते. (Photo Credit : pixabay)
सफरचंद : रोज सफरचंद खाल्ल्याने आपले आरोग्य चांगले राहते. तुमची भूक कमी होते, तसेच रक्तातील साखर नियंत्रित राहते. (Photo Credit : pixabay)
मांसाहार : मधुमेह असलेल्या लोकांसाठी मांसाहार करणे महत्त्वाचे आहे. रोज उकडलेली अंडी खाणे. तसेच आहारात चिकन आणि मासे यांचा समावेश करावा. (Photo Credit : pixabay)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : pixabay)