Cigarettes : पाकिस्तानमध्ये किती रुपयांना विकली जाते गोल्ड फ्लेक?
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, जगभरात 1.3 अब्ज लोक तंबाखूचे सेवन करतात. त्याच वेळी, भारतातील 29 टक्के तरुण मुले-मुली सिगारेट ओढतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपाकिस्तानातही सिगारेट ओढणाऱ्यांची संख्या मोठी आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये 13.4 टक्के लोक सिगारेट ओढतात.
भारत आणि पाकिस्तानचे लोक अशा अनेक सिगारेट ओढतात, पण गोल्ड फ्लेक सिगारेट इथल्या लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. पाकिस्तानमध्ये एक गोल्ड फ्लेकची किंमत किती आहे, हे जाणून घ्याल तर धक्का बसेल.
भारतात ही छोटी गोल्ड फ्लेक सिगारेट 10 रुपयांना मिळते. तर पाकिस्तानात तीच सिगारेट साडेतीन रुपयांना मिळते तर काही ठिकाणी चार रुपयांना मिळते.
tpackss.globaltobaccocontrol च्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानमध्ये गोल्ड फ्लेक पाकिस्तान W2 02 सिगारेटच्या पॅकेटची किंमत 70 रुपये आहे.
जगातील सर्वात महागड्या सिगारेटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या जगातील सर्वात महागड्या सिगारेटचे ब्रँड नाव ट्रेझर लक्झरी ब्लॅक सिगारेट आहे. एका पॅकेटची किंमत 350 भारतीय रुपये आहे.
सिगारेट ओढणे, धूम्रपान करणे हे आरोग्यासाठी घातक आहे. कर्करोग होण्याची शक्यता बळावते. त्याशिवाय दात खराब होणे, प्रजनन क्षमतेवर परिणाम होणे, हृद्यविकार बळावणे आदी आजार होऊ शकतात.