Diabetes : रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात 'या' भाज्यांचा नक्की समावेश करा!
Diabetes : या भाज्या करतील मधुमेहावर नियंत्रण...

'या' भाज्या करतील 'मधुमेहावर' नियंत्रण... (Photo Credit : unsplash)
1/11
आपली बदलती जीवनशैली हेच मधुमेहाचे मुख्य कारण आहे. मधुमेह या आजाराला 'सायलेंट किलर' असेही म्हणतात. (Photo Credit : unsplash)
2/11
मधुमेहामुळे डोळे, किडनी, यकृत, हृदय आणि पाय या अवयवांसंबंधी समस्या सुरू होतात. आजकाल तरुणांनाही मधुमेहाची लागण होत आहे. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात 'या' भाज्यांचा समावेश करा. (Photo Credit : unsplash)
3/11
कारले : कारल्याचा रस मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण उपाय आहे. यात मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात, त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. (Photo Credit : unsplash)
4/11
ब्रोकोली : मधुमेहाच्या रुग्णांसाठी ब्रोकोली आरोग्यास फायदेशीर ठरते. वजन कमी करण्यास ब्रोकोली मदत करते. ब्रोकोली फायबरचा महत्त्वाचा स्त्रोत आहे. (Photo Credit : unsplash)
5/11
भेंडी : भेंडीमध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते. तसेच भेंडी पचायला हलकी असते. भेंडी रक्तातील साखरेचे प्रमाण देखील नियंत्रित ठेवते. (Photo Credit : unsplash)
6/11
काकडी : काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते तसचे काकडी भरपूर फायबर यु्क्त आहे, त्यामुळे काकडी खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. (Photo Credit : unsplash)
7/11
पालक : पालक या भाजीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात आढळते. तसेच कॅलरीजचे प्रमाणही खूप कमी असते. पालक व्हिटॅमिन ए आणि सी ने समृद्ध आहे . पालकमध्ये फायबरही भरपूर प्रमाणात आढळते त्यामुळे शरीरातील साखरेची पातळी कमी होते. (Photo Credit : unsplash)
8/11
गाजर : गाजरात मुबलक प्रमाणात फायबर आढळते, ज्यामुळे शरीरातील साखर हळूहळू कमी होण्यास मदत होते. मधुमेहाची समस्या असलेल्या लोकांनी रोज गाजर खावे. (Photo Credit : unsplash)
9/11
फुलकोबी : फुलकोबीमध्ये कर्बोदकांचे प्रमाण कमी असते. तसेच फुलकोबीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते. (Photo Credit : unsplash)
10/11
कोबी : कोबीमध्ये स्टार्चचे प्रमाण खूपच कमी असते, त्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच कोबीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आढळतात. (Photo Credit : unsplash)
11/11
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)
Published at : 02 Feb 2024 10:44 AM (IST)