Dream Facts: मृत्यूची स्वप्नं का येतात? तज्ज्ञांनी सांगितलं यामागचं कारण
एका स्लीप एक्सपर्टनुसार, जर तुम्ही स्वप्नात स्वत:ला हिंसकपणे मरताना पाहत असाल तर खऱ्या आयुष्यात तुम्हाला तुमच्या शत्रूंवर नजर ठेवण्याचे संकेत मिळत आहेत. तेच जर तुम्ही अगदी सामान्यपणे स्वप्नात मरत असाल तर तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्याचा संकेत मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या जवळची व्यक्ती मेल्याचं स्वप्न तुम्हाला पडलं असेल तर ती व्यक्ती घर किंवा शहर सोडून कुठेतरी जाणार आहे, असे संकेत मिळतात.
स्लीप एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार, एखाद्या पाळीव प्राण्याच्या मृत्यूचं स्वप्न तुम्ही पाहत असाल तर हे तुमच्या आयुष्यातील दु:ख किंवा पिडा निघून जाण्याचे संकेत आहेत.
जर तुम्ही स्वप्नात स्वत:ला किंवा जवळच्या व्यक्तीला मरताना पाहिलं आणि तुमची झोप उडाली असेल तर याचा अर्थ असा की, काही गोष्टींची तुम्हाला माहिती मिळणार आहे. तसेच आयुष्यात तुम्हाला कठीण निर्णय घेण्याची वेळ आली आहे, याचा हा संकेत असतो.
सतत मृत्यूशी संबंधित स्वप्न येत असतील तर याचा अर्थ, तुम्ही चिंतेत आहात. तुम्हाला आरामाची गरज आहे.