Skin Care Tips : चेहऱ्यापेक्षा पाय अधिक ग्लो करतील; फक्त घरबसल्या 'हे' उपाय करून पाहा
तुम्ही तुमच्या पायांची टॅनिंग दूर करू शकता. आणि तुमच्या पायांना चेहऱ्यापेक्षा अधिक मुलायम आणि तजेलदार बनवू शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनियमितपणे आपले पाय सॉफ्ट ठेवायचे असतील तर तुमचे पाय कोमट पाण्याने स्वच्छ करा. पायांची त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी आणि त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी सॉफ्ट स्क्रब वापरा.
लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा: लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा समान प्रमाणात घेऊन पेस्ट बनवा. ही पेस्ट टॅन झालेल्या पायांवर लावा, काही मिनिटे राहू द्या आणि नंतर धुवा.
हळद आणि दही मास्क: पायांवर हळद आणि दह्याचा मास्कसुद्धा फार गुणकारी आहे. हा मास्क 10 ते 15 मिनिटे आपल्या पायांवर लावा. तुम्हाला लगेच फरक जाणवेल.
कोरफड जेल: पायांना ताजे कोरफड जेल लावा. कोरफडीमुळे पाय मऊ होतात आणि त्वचा उजळते.
काकडीचे तुकडे: काकडीचे काप तुमच्या टॅन झालेल्या पायांवर 10-15 मिनिटे ठेवा किंवा त्याचा रस पायाला लावा. काकडी त्वचा सुधारण्यास मदत करू शकते.
सनस्क्रीन लावा: जर तुमचे पाय सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असतील तर त्यांच्यावर चांगला SPFअसलेले सनस्क्रीन लावा.
नियमितपणे मॉइश्चरायझ करा: तुमची त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी चांगले मॉइश्चरायझर लावा. यामुळे कोरडी त्वचा आणि वाढता काळोख टाळता येतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.