World Smile Day 2023 : आज आहे 'वर्ल्ड स्माईल डे'; प्रेक्षकांना खळखळून हसवणारे हे मराठी चित्रपट नक्की बघा
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी 'वर्ल्ड स्माईल डे' साजरा केला जातो.आज 'वर्ल्ड स्माईल डे' निमित्तानं जाणून घेऊयात मराठी विनोदी चित्रपटांबद्दल....
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधुमधडाका हा चित्रपट 1985 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटामधील डायलॉग्स आणि कलाकारांच्या विनोदीशैलीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या पळवा पळवी या चित्रपटानं प्रेक्षकांना खळखळून हसवलं.अभिनेत्री उषा चव्हाण यांनी देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती.
अशी ही बनवाबनवी हा चित्रपट 23 सप्टेंबर 1988 मध्ये रिलीज झाला. हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील आयकॉनिक चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटातील डायलॉग्स आणि गाणी अनेकांना तोंडपाठ आहेत.
‘दे धक्का’ हा चित्रपट 2008 साली चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. त्यानंतर या चित्रपटाचा सिक्वेल देखील प्रेक्षकांच्या भेटीस आला. ‘दे धक्का’ या चित्रपटात शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, मेधा मांजरेकर या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
फुल 3 धमाल हा चित्रपट तीन महिलांच्या कथेवर आधारित आहे. या चित्रपटात प्रिया बेर्डे, मकरंद अनासपुरे, किशोरी गोडबोले, सुचित्रा बांदेकर, प्रसाद ओक यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या गाढवाचं लग्न या चित्रपटामधील कलाकारांच्या कॉमिक टायमिंगला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटात मकरंद अनासपुरे यांनी प्रमुख भूमिका साकारली.
1989 मध्ये प्रदर्शित झालेला माला घेउन चला या दादा कोंडके यांच्या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या चित्रपटात दादा कोंडके यांच्यासोबत मधु कांबीकर यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली होती.