स्वयंपाकघरातील कढीपत्ता केसांच्या मोठ्या समस्या दूर करू शकतो; जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे
केसांच्या वाढीमध्ये कडीपत्ता फार महत्त्वाची भूमिका बजावतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेसांची वाढ वाढवण्यासाठी आणि इतर समस्या दूर करण्यासाठी कढीपत्ता एक नव्हे तर अनेक प्रकारे वापरता येतो.
केसांवर कढीपत्त्याचे फायदे आणि ते फेस मास्क म्हणून किंवा इतर कोणत्याही प्रकारे लावण्याची योग्य आणि प्रभावी पद्धत जाणून घ्या जेणेकरून तुमचे केस निरोगी राहतील.
केसांच्या वाढीसाठी कढीपत्ता खूप फायदेशीर आहे.
बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ असल्याने कढीपत्ता केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी देखील गुणकारी आहे.
जर तुमचे केस खूप निर्जीव, कोरडे आणि खराब झालेले दिसत असतील तर एका भांड्यात खोबरेल तेल गरम करून त्यात थोडी कढीपत्ता घालून शिजवा.
शिजल्यानंतर कढीपत्ता काळी पडल्यावर गॅस बंद करा आणि तेल थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. आंघोळीच्या एक तास आधी हे तेल हलके गरम करून डोक्याला मसाज करा आणि नंतर डोके धुवा.
केस गळण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी खोबरेल तेलात कढीपत्ता शिजवा आणि मेथीचे दाणेही टाका. आठवड्यातून एकदा या तेलाने डोक्याला मसाज करा आणि एक ते दीड तासांनी केस धुवा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.