Winter Diet : हिवाळ्यात दही खावे की नाही?
लोकांना हिवाळ्यात विविध प्रकारचे पदार्थ खायला आवडतात, दही सारख्या थंड पदार्थ खाणे देखील सोडून देतात. लोकांचा असा विश्वास आहे की दही खाल्ल्याने सर्दी आणि घसा दुखू शकतो. पण सत्य काय आहे माहीत आहे का ? [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया, जीवनसत्त्वे, प्रथिने, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे प्रत्येक ऋतूमध्ये हे आरोग्यासाठी फायदेशीर असते. [Photo Credit : Pexel.com]
यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 12 आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते. हिवाळ्यात दही खाल्ल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते. [Photo Credit : Pexel.com]
श्वासोच्छवासाच्या समस्या असलेल्या लोकांनी संध्याकाळी 5 नंतर दही खाणे टाळावे कारण यामुळे त्रास होऊ शकतो यामध्ये विशेषत: ऍलर्जी आणि दमा असलेल्या लोकांचा समावेश होतो. [Photo Credit : Pexel.com]
दह्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे सर्दी झालेल्या लोकांसाठी ते उत्तम बनते. मात्र दही थंड न खाता खोलीच्या तापमानानुसार खावे. [Photo Credit : Pexel.com]
सर्दी झाल्यावर फ्रिजमधून थेट दही खाल्ल्यास त्याच्या तापमानामुळे तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तापमानावर लक्ष ठेवून काळी मिरी पावडरसह दही घ्या जेणेकरून घसा दुखणार नाही. [Photo Credit : Pexel.com]
दही पचनाला चालना देते आणि चयापचय वाढवण्यास मदत करते ज्यामुळे शरीराला आंतरिक उष्णता निर्माण होण्यास मदत होते. [Photo Credit : Pexel.com]
जर तुम्हाला दमा, सायनस किंवा सर्दी-खोकला यांसारख्या श्वसनाच्या समस्या असतील तर तुम्ही हिवाळ्यात आणि विशेषतः रात्रीच्या वेळी दही खाऊ नये. [Photo Credit : Pexel.com]
रात्री दही खाऊ नका - आयुर्वेदानुसार हिवाळ्यात विशेषतः रात्री दही सेवन करू नये , कारण ते तुमच्या ग्रंथींमधून स्राव वाढवते, ज्यामुळे कफ देखील वाढतो. त्यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. [Photo Credit : Pexel.com]
टीप:वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. [Photo Credit : Pexel.com]