Cleaning Hacks : कॉलरचा काळेपणा दूर करायचा आहे? 'हे' सोपे क्लिनिंग हॅक वापरून पहा, शर्ट दिसेल क्षणार्धात स्वच्छ आणि चमकदार
कपड्यांचा सर्वात घाणेरडा भाग म्हणजे शर्ट किंवा टी-शर्टची कॉलर. अनेक कडक डिटर्जंट आणि साबण वापरूनही कॉलरचा काळेपणा दूर होत नाही. जास्त घासल्यामुळे कॉलर फाटण्याची भीतीही असते. आपण काही घरगुती उपाय वापरून कॉलरवरील हट्टी डाग सहजपणे साफ करू शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवॉशिंग मशिनमध्ये महागड्या डिटर्जंटने धुऊन हाताने घासूनही शर्टची कॉलर स्वच्छ होत नाहीत. त्यामुळे तुमचा नवीन शर्टही खराब दिसू लागतो. म्हणूनच, कॉलरच्या साफसफाईच्या काही खास टिप्स फाॅलो करून तुम्ही शर्टची कॉलर क्षणार्धात डागरहित आणि चमकदार बनवू शकता.
व्हिनेगर वापरून तुम्ही शर्टची कॉलर सहज स्वच्छ करू शकता. यासाठी शर्ट 20 मिनिटे पाण्यात भिजवा. एका भांड्यात 2-3 चमचे व्हिनेगर घ्या. नंतर त्यात 2 चमचे लिंबाचा रस घाला. त्यावर हे मिश्रण ओता. आणि 5 मिनिटे राहू द्या. 5 मिनिटांनंतर, शर्ट स्वच्छ पाण्याने धुवा.
सोडा आणि व्हिनेगरच्या मदतीने तुम्ही काही मिनिटांत कॉलरच्या डागांपासून मुक्त होऊ शकता. यासाठी 2-3 चमचे व्हिनेगरमध्ये 1-2 चमचे बेकिंग सोडा मिसळा. आता हे मिश्रण कॉलरवर लावा आणि 5 मिनिटांनंतर ब्रशने घासून स्वच्छ करा. यामुळे कॉलर लगेच साफ होईल.
तुम्ही शर्टची कॉलर साफ करण्यासाठी इतर काही गोष्टी देखील वापरू शकता. अशा परिस्थितीत, ब्लीच पावडर, अमोनिया पावडर आणि हायड्रोजन पेरॉक्साइडचा वापर देखील तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.
काॅलरवरची घाण काढण्यासाठी डिटर्जंटऐवजी शम्पू आणि डिशवॉश सोल्यूशन देखील वापरू शकता. यासाठी एका भांड्यात शॅम्पू आणि डिश वॉश एकत्र करून मिश्रण तयार करा. नंतर टूथब्रशच्या मदतीने ते घासून धुवून काढा.
मानेवर घाम, तेल आणि घाण यामुळे कॉलरवर डाग पडतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला कॉलर लवकर घाण होण्यापासून रोखायचे असेल, तर तुमच्या शरीराच्या स्वच्छतेची चांगली काळजी घ्या.
मानेवरील घाम कमी करण्यासाठी पावडर वापरा. आठवड्यातून एकदा स्क्रब करून आंघोळ करावी. तसेच, गडद रंगाचा शर्ट घातल्याने हा त्रास कमी होऊ शकतो, कारण त्यातून डाग फारसे दिसत नाहीत.
घाण आणि डाग दूर करण्यासाठी थंड पाण्यापेक्षा गरम पाणी अधिक प्रभावी मानले जाते. त्यामुळे, गरम पाण्याचा वापर करा.
जास्त डिटर्जंट वापरल्याने ते तुमच्या कपड्यांवर राहू शकते. त्याच वेळी, खूप कमी डिटर्जंट वापरल्याने काॅलरवरील घाण निघणार नाही. त्यामुळे घाण कमी - जास्त यानुसार डिटर्जंटचा वापर करा.