Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Benefits Of Music Therapy For Kids : तुमचे मूल पण हट्टी आणि रागीट आहे का? ‘संगीत थेरपी’ चा करा अवलंब
बदलत्या जीवनशैलीचा परिणाम थेट आपल्या जीवनावर होतो. मानसिक आरोग्यावर याचे मोठे परिणाम होतात. जीवनशैलीचा परिणाम मोठ्यांपेक्षा जास्त घरातील लहान मुलांवर होतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशाळेतला अभ्यास, घरातील सतत बिघडणारे वातावरण या कारणांमुळे लहान मुलांना स्ट्रेस यायला लागतो आणि त्याचा परिणाम असा होतो की,मुलं हट्टी आणि रागीट बनते.
अशा वेळी चिडक्या आणि हट्टी मुलांना शांत करण्याकरता त्यांना संगीताचा वापर केला जाऊ शकतो. याकरता पालकांना काय करायचे आहे तर आपल्या रागीट आणि हट्टी होत चाललेल्या मुलांना गाण्याचे क्लास लावा, त्यांना एखादे इंस्ट्रुमेंट शिकण्याकरता प्रोत्साहीत करा. ज्याचा परिणाम मुलांमध्ये लगेच जाणवून येऊ शकतो.
संगीत हा आपल्या भावना व्यक्त करण्याचा एक साधा आणि सोपा मार्ग आहे. यामुळे मुलांचा मानसिक विकास होण्यास मदत होते. संगीताचा अवलंब केल्यास मुलं खूश राहू शकते. जाणून घेऊयात मूलांच्या मानसिक आरोग्याकरता संगीत कसे उपयोगी पडते.
मुलं ज्यावेळी गाणे ऐकतात किंवा गातात त्यावेळी त्यांच्या सर्व चिंता आणि तणाव दूर होण्यास मदत होते. त्यांच्या आयुष्यातील एखादी गोष्ट मनाला लागली असेल तर त्या जखमा भरून निघण्यास मदत होते.
लहान मुले त्यांच्या भावना चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकत नाहीत, परंतु जेव्हा ते संगीत शिकतात किंवा संगीताच्या वातावरणात असतात तेव्हा त्यांना भावना समजण्यास आणि त्या योग्यरित्या व्यक्त करण्यास मदत होते. यामुळे जर कधी मोठी काही घटना त्यांच्या आयुष्यात घडली तर त्यावेळी मुलं भावना योग्य रितीने हाताळायला शिकते.
संगीतामुळे मुलांचे संवाद कौशल्यही लक्षणीयरीत्या सुधारते. ते अधिक संवेदनशील होतात आणि त्यांच्या भावना कुटुंबासोबत शेअर करायला किंवा काही गोष्टींशी तडजोड करायला शिकतात.
संगीताने लहान मुलांच्या हृदयावर शक्तिशाली प्रभाव पडतो.मुलं मानसिक आणि शारिरीक दृष्ट्या मजबूत बनते.
मुलं संगीत शिकत असेल तर त्याला असणारे विविध आजार कमी करता येतात, हे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. वेदना कमी करण्यासाठी संगीत अत्यंत परिणामकारक आहे.
संगीताने मनःस्थिती तर सुधारतेच पण एकाग्रता वाढते आणि मेंदूचे कार्य सुधारते.