Health Tips : दररोज खा फक्त 2 खजूर आणि मिळवा अनेक फायदे
दर दिवशी फक्त 3 खजूर खाल्ल्यामुळं याचा अतिशय चांगला परिणाम तुमच्या शरीरावर होतो. यातीलच एक परिणाम दिसून येतो तो म्हणजे शरीराच्या वजनावर.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखजूर खाल्ल्यामुळे वजन कमी करण्यास मोठी मदत होते. त्यामुळे आहाराच्या दैनंदिन सवयी अर्थात डाएय प्लानमध्ये खजुराचा समावेश करण्याचा फायदाच होणार आहे.
फायबर म्हणजेच लाभदायक कार्बोहायड्रेट्सचा चांगला स्त्रोत म्हणून खजुराकडे पाहिलं जातं. ब्लड ग्लूकोज आणि स्निग्ध घटकांचा समतोल राखण्यासाठी याचा फायदा होतो.
खजुरामध्ये असणाऱ्या अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडमुळं इन्सुलिन, किंवा डायबिटीजमुळं शरीराला चढलेली सूज कमी होण्यास मदत होते.
प्रथिनांना स्त्रोत असल्यामुळं भूक शमवण्यासही खजूराची मदत होते. ज्यामुळं भूक फार कमी वेळातच शमवून वजन कमी होण्याच खजुराची मदत मिळते.
खजुरातील बी काढून त्यात अकरोड किंवा आणखी कोणताही सुका मेवा भरल्यास त्याची चव आणखी सुरेख लागते.
दूध, योगर्ट, कस्टर्डसोबतही खजूराची चव चांगली लागते. पण, या साख्या पदार्थांमध्ये खजूर असल्याच रिफाइन्ड साखरेचा वापर टाळावा.
मिठाई किंवा गोडाचा एखादा पदार्थ खाण्याची इच्छा असल्यास डाएटला केंद्रस्थानी ठेवता अशा पदार्थांऐवजी खजूर खाणं कधीही उत्तम.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.