Benefits Of Coriander Leaves : कोथिंबीरीच्या पानांमध्ये आहेत अनेक औषधी गुणधर्म , याचे नियमित सेवन केल्यास मिळतील असंख्य फायदे
कोणत्याही खाद्यपदार्थाला कोथिंबीरीने सजवले तर कोणताही पदार्थ खूप छान दिसतो. पण तुम्हाला माहित आहे का? या कोथिंबीरीत मोठ्या प्रमाणात पौष्टिक घटक असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोथिंबीर मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, व्हिटॅमिन ए, बी, सी आणि के सारख्या अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. कोथिंबीर खाण्याचे फायदे काय आहेत? जाणून घ्या.
कोथिंबीरीच्या नियमित सेवनाने शरीरात जमा झालेले अतिरिक्त मीठही काढून टाकले जाते, ज्यामुळे रक्तदाब कमी होतो. कोथिंबीर खराब कोलेस्ट्रॉल, LDL कमी करण्यास मदत करू शकते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
कोथिंबीर शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करते.
कोथिंबीरमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स देखील कर्करोगाच्या पेशींची वाढ कमी करतात.
हिरव्या कोथिंबीरपासून शरीराला पोषक आणि अनेक प्रकारची जीवनसत्त्वे मिळतात. ज्यामध्ये व्हिटॅमिन के हाडे मजबूत करण्यासाठी आणि जखमा भरण्यासाठी खूप चांगले आहे, त्याचप्रमाणे व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी शरीरासाठी खूप चांगले आहे.
कोथिंबिरीच्या पानांमध्ये भरपूर फायबर आणि अँटिऑक्सिडंट असतात जे पचन सुधारण्यास, चयापचय वाढवण्यास आणि बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करतात.
कोथिंबीरमुळे तुमची पचनशक्ती वाढते आणि त्यामुळे तुमच्या शरीरावरील ताण कमी होतो. कोथिंबीरमध्ये आढळणारे पोषक ऑक्सिडेटिव्ह ताण देखील कमी करतात.
फूड केमिस्ट्रीमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार असे आढळून आले आहे की कोथिंबीरमध्ये विशेष घटक असतात. जे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. अशा प्रकारे, तुमची ग्लुकोज पातळी नियंत्रणात राहते.
या सर्व फायद्यांमुळे शक्य असल्यास रोज कोथिंबीरचे सेवन करा.