वजन कमी करण्याबरोबरच शरीरासाठीही अंजीर गुणकारी; वाचा फायदे
अंजीर एक असा ड्रायफ्रूट आहे जो स्वादिष्ट असण्याबरोबरच अनेक आजारांना देखील दूर ठेवतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंजीर या ड्रायफ्रूटमुळे आपल्या शरीराला खूप ताकद मिळते आणि हाडेही मजबूत होतात.
याशिवाय पुरुषांसाठीही अंजीर खूप फायदेशीर मानले जाते. प्रत्येक व्यक्तीने दिवसातून किमान दोनदा अंजीर खाणे आवश्यक आहे, परंतु जर तुम्ही अंजीर जास्त प्रमाणात खाल्ले तर ते तुमचे नुकसान देखील करू शकते.
तुम्ही तुमच्या आहारात अंजीरचा समावेश केला तर ते तुमचे वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.
मोठ्या कच्च्या अंजीरमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि जर तुम्ही ते खाल्ले तर ते लठ्ठपणा टाळण्यास मदत होऊ शकते.
तुम्ही दूधात एक ते दोन अंजीर उकळवून घ्या. त्यानंतर तयार होणारं दूध हे इम्युनिटी बूस्टर ड्रिंक बनतं. शरीरातील अनेक रोगांवर मात करण्यासाठी हे अंजीरयुक्त दूध फायदेशीर ठरतं.
डॉक्टरांच्या मते, अंजीर सकाळी उपाशीपोटी नाश्त्याला घेणे सगळ्यात जास्त फायदेकारी ठरतं.
अंजीरमध्ये मोठ्या प्रमाणात फायबरचा समावेश असतो. त्यामुळे ही फळे तुम्हाला दीर्घकाळ एनर्जेटिक ठेवतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.