South India Tour: दक्षिण भारतात फेरफटका मारण्याची सुवर्ण संधी; या 11 दिसाच्या टूरसाठी एवढा खर्च येणार
South India Tour: दक्षिण भारतात फेरफटका मारण्याची सुवर्ण संधी या 11 दिसाच्या टूरसाठी एवढा खर्च येणार

South India Tour
1/10
तुमहालाही दक्षिण भारतात फिरायला जायची इच्छा आहे का? असेल तर दक्षिण भारतातील या टूर बद्दल सविस्तर जाणून घ्या. (Photo Credit : Pexels)
2/10
दक्षिण भारतात प्रवास करण्यासाठी IRCTC ने एक उत्तम पॅकेज आणले आहे. या पॅकेज मध्ये नक्की काय काय आहे? जाणून घ्या. (Photo Credit : Pexels)
3/10
IRCTC ने जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये पर्यटकांसाठी दक्षिण भारताचे खास टूर पॅकेज आणले आहे. दक्षिण भारताला भेट देण्यासाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो.(Photo Credit : Pexels)
4/10
हे पॅकेज छत्तीसगडमधील कोरबा येथून सुरू होईल. हे 11 दिवस आणि 10 रात्रीचे टूर पॅकेज आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण दक्षिण भारतात ट्रेनने प्रवास करण्याचा आनंद घेता येणार आहे. (Photo Credit : Pexels)
5/10
या पॅकेजमध्ये, कोरबा व्यतिरिक्त, तुम्हाला चंपा, रायपूर, गोदिया, दुर्ग, नागपूर अशा अनेक ठिकाणी ट्रेनमध्ये चढण्याची आणि उतरण्याची संधी मिळणार आहे. (Photo Credit : Pexels)
6/10
या ट्रेनमध्ये तुम्हाला एसी 3 आणि 2 या दोन्हीमध्ये प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. याच आधारावर पॅकेजचे भाडे ठरवले जाईल. (Photo Credit : Pexels)
7/10
तसेच या पॅकेजमध्ये तुम्हाला नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाचीही सुविधा देखील मिळत आहे. प्रवासा दरम्यानच प्रवाशांना दुपारचे जेवण दिले जाईल.(Photo Credit : Pexels)
8/10
त्याचबरोबर या पॅकेजमध्ये तुम्हाला कोडाईकनाल, कोईम्बतूर, उटी, कुन्नूर, म्हैसूर अशा ठिकाणी प्रवास करण्याची संधी मिळत आहे. (Photo Credit : Pexels)
9/10
हा प्रवास 24 जानेवारी आणि 7 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणार आहे. (Photo Credit : Pexels)
10/10
या पॅकेजमध्ये तुम्ही 2 एसीमध्ये प्रवास केल्यास तुम्हाला 35,045 ते 47,230 रुपये मोजावे लागतील, तर 3 एसीमध्ये प्रवास केल्यास तुम्हाला प्रति व्यक्ती 40,980 ते 53,170 रुपये मोजावे लागतील.(Photo Credit : Pexels)
Published at : 06 Jan 2024 05:50 PM (IST)