In Pics | कोरोना संकटात वाहिनी आणि मालिका निर्मात्यांकडून सर्व कलाकार, तंत्रज्ज्ञाची विशेष काळजी
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशावेळी महाराष्ट्रात लॉकडाऊनचा निर्णय घेऊन नियमावली कठोर करण्यात आली. यामध्ये मालिका, सिनेमांच्या चित्रिकरणावर पूर्णपणे बंदी आणण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे मराठी मालिकादेखील महाराष्ट्राची वेस ओलांडून परराज्यात चित्रीकरण करत आहेत.
हा प्रवास आम्ही करतोय तो फक्त प्रेक्षकांचा मनोरंजनाचा प्रवास खंडित न होता, अजून मनोरंजक व्हावा म्हणून, असं या कलाकारंचं म्हणणं.
झी मराठीवरील सर्व मालिकांचे कलाकार आणि तंत्रज्ञ मग ते स्पॉट दादा असो किंवा मग मुख्य कलाकार कुठेही भेदभाव न करता या सर्वांची राहण्याची सोय त्या त्या शहरातील सर्वोत्तम हॉटेल / रिसॉर्ट मध्ये करण्यात आली आहे.
अजून एक विशेष बाब म्हणजे सर्व तंत्रज्ज्ञ हे सुरुवातीपासून मालिकेशी जोडले गेलेत म्हणजेच सर्व तंत्रज्ञ हे आपल्या महाराष्ट्रातील आहेत.
मालिकांचं संकलन देखील त्याच ठिकाणी होतंय. बायोबबल पद्धतीने मालिकांचं शूटिंग सुरु आहे. झी मराठीवरील मालिकांचं चित्रिकरण बेळगाव, गोवा, सिल्वासा, दमण आणि जयपूर सुरु आहे.