Independence day ; स्वातंत्र्यदिनानिमित्त कलाकारांनी दिल्या खास शुभेच्छा !
स्वातंत्र्यदिन अवघ्या दोन दिवसांवर आहे. या निमित्ताने देशभक्तीचं वातावरण सगळीकडे निर्माण झालं आहे. या निमित्ताने झी मराठीवरील कलाकारांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त समाजात कोणते बदल घडायला हवेत याबद्दल आपलं मत मांडलं आहे. ते जाणून घेऊयात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवा मालिकेतील अभिनेत्री पूर्वा कौशिकने स्वातंत्र्यदिनानिमित्त मत मांडताना तिने स्त्री-पुरुष समानतेवर भाष्य केलं आहे. तसेच, समाजातील शिक्षण पद्धतीत बदल घडायला हवा असं तिने म्हटलंय.
ती पुढे म्हणाली, आजही आपल्याकडे बोललं जातं की, 'अरे तो करतोय ना, तो करणारच, तू काय करतेस?' तर असं न होता स्त्री-पुरुष दोघांना समान नजरेने पाहिलं पाहिजे.
तसेच, 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेतील अभिनेत्री शिवानी नाईक म्हणते, 'लहानपणी स्वातंत्र्यदिन खूप गोड साजरा व्हायचा सकाळी शाळेत जाऊन सर्वजण झेंडा वंदन करायचो. पण आता पुष्कळ बदल झाला आहे. काही लोक 15 ऑगस्ट फक्त एक सुट्टी म्हणून बघतात'.
पुढे ती म्हणाली की, 'मला असं वाटतं की सगळेजण समान आणि एकत्र राहून काय करता येऊ शकतं याकडे लक्ष दिले तर गोष्टी खूप वेगळ्या पद्धतीने होतील आणि विचारांचा विकास होईल.'
तर, 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेतील अभिनेता अक्षय म्हात्रे म्हणतो की , भारतात माझ्या डोळ्यांसमोर मी जे बदल पाहिले आहेत ते म्हणजे इंफ्रास्ट्रक्चरमध्ये विकास.माझ्या लहानपणी आमच्या घराजवळ एकही मॉल नव्हता पण आता तीन मॉल आहेत, त्याबरोबर मोठमोठे टॉवर्स, हायवेमध्ये विकास होताना पाहायला मिळतोय.
मला आणखीन काही गोष्टींची प्रगती झालेली पाहायला आवडेल ते म्हणजे रोजगार आणि व्यवसाय विभागात. आपल्या देशात व्यापार करणारे लोक अधिक वाढले पाहिजेत ज्यामुळे नवीन रोजगार निर्मिती होऊ शकते.
'लाखात एक आमचा दादा' मालिकेतील अभिनेत्री दिशा परदेशी म्हणते की, 'भारताचा शेतीमध्ये विकास झाला आहे यात शंका नाही पण मला शेतीत अधिक प्रगती पाहायला आवडेल आणि माझ्या मते तरुण पिढीला या विषयावर शिक्षित केले पाहिजे ज्याने देशाचीही प्रगती होईल.'
मी अभिनय क्षेत्रात आहे तर जर मला कधी संधी मिळाली तर सुभाष चंद्र बोस यांच्या सैन्य दलातील महिला सैनिक सरस्वती राजमानी यांनी भूमिका साकारायला आवडेल.
तर, 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेतील अभिनेत्री वल्लरी विराजचं म्हणणं आहे की, मला कळायला लागल्यापासून आपल्या देशात शाळा आणि शिक्षणपद्धती, हॉस्पिटल्स मेडिकल, इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रात बदल पाहिले आहेत.
मला असं वाटतं 'स्त्रियांना समान वागणूक आणि स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे मोठ-मोठ्या शहरांत खूप प्रमाणात हे घडलंय पण अजूनही छोट्या शहरांत आणि गावाकडे अजून त्यात तितकी प्रगती नाही.'