In Pics : नात्यास नाव आपुल्या...; अग्नीच्या साक्षीनं यामी- आदित्यच्या सहजीवनाची सुरुवात
बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) गुरुवार (4 जून) रोजी विवाहबंधनात अडकली यामी गौतमने लेखक आणि दिग्दर्शक आदित्य धरसोबत (Aditya Dhar) लग्नगाठ बांधली. स्वत: सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिनं आपल्या लग्नाची बातमी चाहत्यांना दिली. (सर्व छायाचित्र- इनस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयामी गौतमने इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये यामीने लाल रंगाची साडी नेसली आहे आणि आदित्यने पांढऱ्या रंगाची शेरवानी आणि पगडी घातली आहे. (सर्व छायाचित्र- इनस्टाग्राम)
'उरी' या चित्रपटाच्या निमित्तानं यामी आणि आदित्यनं एकत्र काम केलं होतं. आदित्यनंच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. (सर्व छायाचित्र- इनस्टाग्राम)
लग्नाच्या पहिल्या फोटोमागोमागच यामी आणि आदित्यच्या या छोटेखानी विवाहसोहळ्याचे आणखीही फोटो पोस्ट करण्यात आले. (सर्व छायाचित्र- इनस्टाग्राम)
या नवविहाहित सेलिब्रिटी जोडीचे हे फोटो पाहून चाहत्यांनी लगेचच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात झाली. चाहत्यांसोबतच कलाविश्वातील अनेक मंडळींनीही यामी आणि आदित्यला त्यांच्या या नव्या इनिंगच्या शुभेच्छा दिल्या. (सर्व छायाचित्र- इनस्टाग्राम)