National Film Awards 2021 | 'हे' आहेत 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते
काल 67व्या राष्ट्रीय चित्रपटांच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' आणि 'पंगा' या चित्रपटासाठी कंगना रनौतहा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. कंगना राणौतचा हा चौथा पुरस्कार आहे.
मणिकर्णिका सिनेमाचं दिग्दर्शनही कंगनाने केलं आहे.
मनोज वाजपेयीला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे. 'भोसले' चित्रपटातील कामासाठी मनोज वाजपेयीला हा पुरस्कार देण्यात आला आहे.
तामिळ चित्रपटासाठी धनुषला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर अभिनीत चित्रपट 'छिछोरे' सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून गौरवण्यात आलं आहे. चित्रपटगृहात रिलीज झालेला 'छिछोरे' हा सुशांतचा शेवटचा चित्रपट ठरला.
जल्लीकट्टू या चित्रपटाला बेस्ट सिनेमॅटोग्राफर या पुरस्काराने गौरविण्यात आले.
अभिनेता अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेल्या केसरी चित्रपटातील ‘तेरी मिट्टी मे मिलजावा’ या गाण्यासाठी बी प्राक यांना सर्वोत्तम गायक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालाय.