हृदयद्रावक छायाचित्रे : तेलंगणामध्ये कबड्डी सामन्यादरम्यान स्टेडियमची गॅलरी कोसळली, अनेक जखमी
तेलंगणाच्या सूर्यपेठ जिल्ह्यात सोमवारी मोठा अपघात झाला. कबड्डी स्पर्धेपूर्वी स्टेडियमची गॅलरी कोसळली. या अपघातात 100 लोक जखमी झाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपोलिसांनी सांगितले की, सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी पाच-सहा जणांना फ्रॅक्चर झाले आहे. इतर जखमी झालेल्या लोकांची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, गॅलरी कोसळल्यानंतर बरेच प्रेक्षकांना चालताही येत नव्हते. त्यांना रुग्णवाहिका, पोलिस व इतर वाहनांनी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
लाकूड आणि इतर साहित्यापासून तयार केलेली गॅलरी नित्कृष्ट बांधकामामुळे कोसळल्याचे पोलिसांनी सांगितले. ते म्हणाले की, अपघाताची नेमकी कारणे तपासानंतरच कळू शकतील.
सूर्यपेठचे जिल्हा पोलिस अधीक्षक आर भास्करन म्हणाले की, “आम्ही गॅलरी आणि रुग्णालय या दोन्ही परिस्थितीवर नजर ठेवून आहोत.” 47 व्या ज्युनियर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा सुरु होण्याआधी हा अपघात झाला.
तेलंगणा कबड्डी असोसिएशन आणि सूर्यपेठ जिल्हा कबड्डी असोसिएशन संयुक्तपणे या स्पर्धेचे आयोजन करीत होते.