In Pics | गुरुद्वारामध्ये का होते मधुबालाच्या नावे अरदास, वाचा रंजक किस्सा
वडिलांच्याही निधनानंतर गुरुद्वारा समितीनं मधुबाला या शरीररुपात आपल्यासमवेत नसल्या तरीही गुरुनानक यांच्याप्रती असणाऱी त्यांची श्रद्धा पाहून त्या या गुरुद्वारामध्ये कायमच स्मरल्या जातील असं म्हटलं. त्यामुळं गुरुनानक देव यांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी होणाऱ्या अरदासमध्ये इथं म्हटलं जातं, है पातशाह, आपकी बच्ची मधुबाला की तरफ से लंगर-प्रशाद की सेवा हाजिर है, उसे अपने चरणों से जोड़े रखना.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंधेरी गुरुद्वारातील व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार 1969 मध्ये मृत्यूपुर्वी मधुबाला यांनी इच्छा व्यक्त केली होती की, गुरुनानक जयंतीच्या निमित्तानं त्यांना लंगरची सेवा द्यायची होती. त्या दिवसाच्या लंगरचा सर्व खर्च मधुबाला एका धनादेशाच्या माध्यमातून देत असत. जवळपास 7 वर्षांसाठी हे सत्र सुरु राहिलं. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वडिलांनीही 6 वर्षे लंगर सेवा देणं सुरु ठेवलं होतं.
चित्रीकरण झाल्यानंतर ज्यावेळी महेंद्र यांनी याबाबत मधुबाला यांना विचारलं तेव्हा त्या उत्तर देत म्हणालेल्या, 'जीवनात सारंकाही असूनही मी बिथरले होते. त्यावेळी एका जाणकार व्यक्तीनं मला अंधेरी येथील गुरुद्वारामध्ये नेलं. दर्शनानंतर ज्यावेळी तिथं मी माझ्या मनातील व्यथा सांगितली तेव्हा मला जपुजी साहिबचं पठण करण्याचा सल्ला देण्यात आला. मला गुरुमुखी भाषा अवगत नसल्यामुळं मग मी फारसी भाषेतील या पुस्तकाची आवृत्ती मागवली. तेव्हापासून मी अगदी न चुकता हे पुस्तक वाचते. यामुळं मनाला एक वेगळीच शांती लाभते'.
गतकाळातील गाजलेले संगीत दिग्दर्शक एस. महेंद्र यांच्यानुसार या गोष्टीचा खुलासा तेव्हा झाला, ज्यावेळी एके दिवशी चित्रपटाच्या पुढील दृश्याची तयारी झाली, मधुबाला यांना बोलवणंही आलं. त्यावेळी त्यांनी पर्समधून एक लहानसं पुस्तक काढलं आणि डोक्यावरुन ओढणी घेत ते वाचू लागल्या. दृश्यासाठी बोलवणं आलं त्यावेळी त्यांनी हे पुस्तक आणि पर्स महेंद्र यांच्या जबाबदारीवर सोडून देत त्या चित्रीकरणासाठी गेल्या. त्याचवेळी महेंद्र यांनी पुस्तक खोलून पाहिलं तेव्हा ते फारसी भाषेतील जपुजी साहिब असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
जपुजी साहिबचं दररोज पठण करणाऱ्या मुमताज जहां देहलवी म्हणजेच मधुबाला ज्यावेळी त्यांच्या कारकिर्दीच्या परमोच्च शिखरावर होत्या, त्यावेळी चित्रपट निर्मात्यांपुढं त्या एक अट ठेवायच्या. जगात किंवा देशात आपण कुठेही चित्रीकरण करत असलो तरीही गुरुनानक जयंतीच्या दिवशी म्हणजेच गुरुपर्वच्या दिवशी मुंबईतील अंधेरी येथे असणाऱ्या गुरुद्वारामध्ये मला हजेरी लावू दिली जावी. किंबहुना ही अट त्या प्रस्तावात लेखीस्वरुपातही स्वीकार करून घेत असंत.
जीवनाचा प्रवास लहानसा असला तरीही कलाविश्ताली आपल्या प्रवासांमध्ये एक काळ गाजवणारी अभिनेत्री म्हणून मधुबाला यांच्या अनेक स्मृतींना आजही उजाळा दिला जातो. आरस्पनी सौंदर्य लाभलेल्या मधुबाला या आजही तितक्याच लोकप्रिय आहेत जितक्या त्या कैक वर्षांपूर्वी होत्या. नुसत्या नजरेनं किंवा मग एका स्मितहास्यांन चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या मधुबाला यांची गुरु नानकांवर फार श्रद्धा होती. इतकी की जीवनातील अखेरच्या क्षणीही त्यांच्याकडे जपुजी साहिब हे पुस्तक होतं असं म्हटलं जातं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -