Upcoming OTT Release: नोव्हेंबर महिन्यात OTT वर मनोरंजनाचा धमाका; नव्या सिनेमांसह वेब सिरीजची मेजवानी
नोव्हेंबर महिन्यात अनेक वेब सिरीज आणि सिनेमे रिलीज होणार आहेत. हे चित्रपट आणि सिरिज Netflix, Zee5, प्राईम व्हिडीओ इत्यादी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतील.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविजय 69 (Vijay 69) : इमोशनल ड्रामा फिल्म 'विजय 69' OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज होणार आहे. हा चित्रपट 8 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अनुपम खेर, चंकी पांडे आणि मिहिर आहुजा दिसणार आहेत.
ये काली काली आँखें (Ye Kaali Kaali Aankhen): नेटफ्लिक्सची रोमँटिक क्राईम थ्रिलर सिरीज 'ये काली काली आँखे' त्याच्या दुसऱ्या सीझनसह परतणार आहे. त्याचा प्रीमियर 22 नोव्हेंबरला होणार आहे.
द बकिंघम मर्डर्स (The Buckingham Murders): थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर, करीना कपूरचा 'द बकिंगहॅम मर्डर्स' चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 8 नोव्हेंबरपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
मिथ्या : द डार्कर चॅप्टर: ZEE5 1 नोव्हेंबर रोजी 'मिथ्या: द डार्कर चॅप्टर' ही सायकॉलॉजिकल ड्रामा सिरीज रिलीज करणार आहे. या सिरीजमध्ये हुमा कुरेशी आणि अवंतिका दासानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
फ्रीडम एट मिडनाईट: निखिल अडवाणीचा 'फ्रीडम ॲट मिडनाईट' सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे. या सिरीजची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु ओटीटी प्लॅटफॉर्मनं निश्चितपणे सांगितलं आहे की, ही वेब सिरीज नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होईल. या मालिकेत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निवडणुकीपासून ते त्यावेळी भारतात काय घडलं? ते तपशीलवार दाखवण्यात आलं आहे.
सिटाडेल: हनी बनी: अमेरिकन वेब सीरीज 'सिटाडेल' चं हिंदी वर्जन 'सिटाडेल: हनी बनी' 7 नोव्हेंबरला प्राईम व्हिडीओवर रिलीज केली जाणार आहे. या सिरीजमध्ये समंथा रुथ प्रभु, वरुण धवन, एम्मा कॅनिंग, केके मेनन, सिकंदर खेर, साकिब सलीम, रायमुंडो क्वेरिडो आणि काशवी मजमुंदर मुख्य भुमिकेत दिसणार आहेत.
देवरा: जूनियर एनटीआर, जाह्नवी कपूर आणि सैफ अली खान यांची फिल्म 'देवरा' नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट 8 नोव्हेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम केला जाणार आहे.