In Pics : घरगुती हिंसा, अटक आणि जामीन ....; ये रिश्ता क्या कहलाता है?

अभिनेता करण मेहराने आपल्याला अनेकदा मारहाण केल्याचा आरोप त्याची पत्नी आणि अभिनेत्री निशा रावलने केला ज्यानंतर तिनं रितसर तक्रार केल्यानंत त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. (छाया सौजन्य-इन्स्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
करणचे विवाहबाह्य संबंध आहेत, असा दावाही त्याच्या पत्नीने केला आहे. संपूर्ण प्रकरणावर माध्यमांशी बोलताना निशाने आपली बाजू मांडली, यावेळी तिनं मारहाण झाल्याचा फोटोही दाखवला. (छाया सौजन्य-इन्स्टाग्राम)

निशाची ही अवस्था आणि करणसोबतच्या नात्यात आलेलं वादळ पाहताना या सेलिब्रिची जोडीचा वाद इतका विकोपाला गेलाच कसा हाच प्रश्नच चाहत्यांच्या मनात घर करत आहे. (छाया सौजन्य-इन्स्टाग्राम)
निशा रावलने सोमवारी (31 मे) रात्री करण मेहराविरोधात मुंबईत तक्रार दाखल केली. त्यानंतर गोरेगाव पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी करण मेहराला जामीन मिळाला आहे. आपल्याला अडकवण्यासाठी निशा रावलने स्वत:चं डोकं भिंतीवर आपटून घेतल्याचा दावा करण मेहराने केला. (छाया सौजन्य-इन्स्टाग्राम)
तर, खुद्द करणनंच हो, माझं एका तरुणीवर प्रेम असून तिच्यासोबत फिजिकल रिलेशनमध्ये आहे. ती तरुणी दिल्लीतील आहे असं सांगितल्याचा धक्कादायक खुलासा निशानं केला. (छाया सौजन्य-इन्स्टाग्राम)
माझं अजूनही करणवर प्रेम असून लग्न टिकावं म्हणून मी प्रयत्न करत होते. त्याने अनेकदा मला मारहाण केली पण मी कधीही याची वाच्यता केली नाही. त्याची लोकांमध्ये 'नैतिक' ही प्रतिमा होती. त्यामुळे जर मी काही बोलले असते तर त्याला तडा गेला असता, त्याच्या कामावर परिणाम झाला असता. त्यामुळे पत्नी म्हणून मी कायम त्याच्या पाठिशी राहिले. परंतु सोमवारी रात्रीच्या प्रकारानंतर मी स्वत:साठी उभं राहण्याचा, लढण्याचा निर्धार केला. माझी आई कमकुवत आहे, असा विचार माझ्या मुलाने करु नये असं मला वाटतं. कोणीही एखाद्या मानसिक आणि शारीरिक त्रास देऊ शकत नाही, असं तिने पुढे सांगितलं. (छाया सौजन्य-इन्स्टाग्राम)