Vastu Tips : उत्तर की दक्षिण? घरातील खिडकीची योग्य दिशा कोणती? सुख, शांतीसाठी जाणून घ्या खिडकीशी संबंधित वास्तूशास्त्र...
वास्तूशास्त्रानुसार, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समाधान हवं असेल तर त्यासाठी घरातील प्रत्येक वास्तू योग्य ठिकाणी असणं गरजेचं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्याचप्रमाणे, घराची खिडकीचा देखील आपल्या आयुष्यात फार मोलाचा वाटा असतो. वास्तूशास्त्रानुसार, जर घराची खिडकी योग्य ठिकाणी नसेल तर वास्तूदोष लागतो.
याचं कारण म्हणजे, खिडकीच्याद्वारे बाहेरची हवा, ऊर्जा घरात येते. पण, खिडकीतून फक्त प्रकाश किंवा हवाच नाही तर सुख आणि सौभाग्यही येतं.
यासाठीच, घराची खिडकी योग्य दिशेला असावी. पण, घराची खिडकी उत्तर की दक्षिण दिशेला असावी? असा अनेकांना प्रश्न पडतो. याचंच उत्तर जाणून घेऊयात.
वास्तूशास्त्रानुसार, घराच्या खिडकीची दिशा उत्तर दिशेला असावी. उत्तर दिशेला असणाऱ्या खिडकीतून घरात सकारात्मक ऊर्जा येते.
जर तुमच्या घराची खिडकी दक्षिण दिशेला असेल तर त्या ठिकाणी वेळोवेळी पडदा लावा. खिडकीजवळ छान रोप लावा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)