Thalapathy Vijay : थलापती विजयचे 48 व्या वर्षात पदार्पण, पहावे असे 10 सुपरहिट चित्रपट
1. लव्ह टुडे (Love Today) : 'लव्ह टुडे' हा लोकप्रिय तामिळ सिनेमा आहे. विजयचा हा रोमँटिक, विनोदी सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. पाच कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेल्या या सिनेमाने 100 कोटींची कमाई केली आहे. आयएमडीबी रेटिंगमध्ये या सिनेमाला 8.7 रेटिंग मिळाले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2. पूवे उनाक्कागा (Poove Unakkaga) : 'पूवे उनाक्कागा' हा तामिळ सिनेमा 1996 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. दाक्षिणात्य दिग्दर्शक विक्रमनने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. विजयचा हा पहिला ब्लॉकबस्टर सिनेमा असून आयएमडीबी रेटिंगमध्ये या सिनेमाला 8.6 रेटिंग मिळाले आहे.
3. प्रियामुदन (Priyamudan) : विजयचा 'प्रियामुदन' हा सिनेमा 1998 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. विजयच्या 'टॉप 10' सिनेमांमध्ये हा सिनेमा तिसऱ्या क्रमांकावर असून या सिनेमाला 8.5 रेटिंग मिळाले आहे.
4. थुल्लाधा मनामुम थुल्लुम (Thulladha Manamum Thullum) : 'थुल्लाधा मनामुम थुल्लुम' या सिनेमात विजय आणि सिमरन मुख्य भूमिकेत होते. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा यशस्वी ठरला. या सिनेमाला 8.3 रेटिंग मिळाले आहे.
5. कधालुक्कू मरियाधाई (Kadhalukku Mariyadhai) : 'कधालुक्कू मरियाधाई' हा रोमँटिक तामिळ सिनेमा आयएमडीबीच्या शर्यतीत पाचव्या क्रमांकावर आहे. या सिनेमाला 8.2 रेटिंग मिळाले आहे.
6. थुप्पक्की (Thuppakki) : 'थुप्पक्की' हा थरार, नाट्य असणारा अॅक्शनपट आहे. 13 नोव्हेंबर 2012 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आयएमडीबी रेटिंगमध्ये या सिनेमाला 8.1 रेटिंग मिळाले आहे.
7. कठ्ठी (Kaththi) : 'कठ्ठी' हा अॅक्शन, ड्रामा असणारा तामिळ सिनेमा आहे. 70 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली होती. आयएमडीबी रेटिंगमध्ये या सिनेमाला 8.1 रेटिंग मिळाले आहे.
8. घिल्ली (Ghilli) : थलापती विजयचा 'घिल्ली' हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. आयएमडीबीच्या शर्यतीत या सिनेमाला 8.1 रेटिंग मिळाले आहे.
9. सेंधूरपंडी (Sendhoorapandi) : 'सेधूरपंडी' हा तामिळ रोमँटिक सिनेमा आहे. 1993 रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. आयएमडीबीच्या शर्यतीत या सिनेमाला 8.0 रेटिंग मिळाले आहे.
10. मित्रांनो : थलापती विजयच्या 'मित्रांनो' या सिनेमाला आयएमडीबीमध्ये 7.9 रेटिंग मिळाले आहे.