In Pics : बर्थडे पार्टी पडली महागात; ड्रग्ज घेतल्याप्रकरणी अभिनेत्री नायरा शाह पोलिसांच्या ताब्यात
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाला जोडून सुरु असणाऱ्या ड्रग्ज प्रकरणी दिवसागणिक मोठे खुलासे होत गेले. यातच आता एका अभिनेत्रीच्या नावानं ड्रग्ज प्रकरणी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. मुंबईत तेलुगू अभिनेत्री नायरा शाह हिला ड्रग्ज प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (छाया सौजन्य- instagram @iamnairashah)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरविवारी तेलुगू कलाविश्वातील प्रसिद्ध नाव असणाऱ्या नायरा शाह हिला पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागलं. (छाया सौजन्य- instagram @iamnairashah)
पार्टी करण्यास परवानगी नसतानाही नायरा मुंबईतील जुहू स्थित एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्टी करत होती. सूत्रांच्या माहितीनुसार बर्थडे पार्टीत ही सर्व मंडळी सहभागी झाली होती. (छाया सौजन्य- instagram @iamnairashah)
पोलिसांना या पार्टीची माहिती मिळताच त्यांनी सदर ठिकाणी धाड टाकली. जिथून चरस असणारी सिगरेट जप्त करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईदरम्यान नायराही अमली पदार्थांचं सेवन करत होती ही बाब समोर आल्याचं म्हटलं जात आहे. (छाया सौजन्य- instagram @iamnairashah)
सूत्रांच्या हवाल्यातून मिळालेल्या माहितीनुसार या पार्टीसाठी नायराचे गोव्यातील काही मित्रही उपस्थित होते. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. सोमवारी त्यांना वांद्रे न्यायालयात हजर केल्यानंतर जामीन देण्यात आला. (छाया सौजन्य- instagram @iamnairashah)
सध्या पोलीस सदर प्रकरणाचा तपास करत असून, ड्रग्ज नेमके कोणी पुरवले याचे धागेदोरे शोधत आहेत. शिवाय नायराची वैद्यकीय तपासणीही केली जात असून, तिच्या शरीरात ड्रग्जचा अंश आढळल्यास तिच्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते. (छाया सौजन्य- instagram @iamnairashah)