Court Marriage Tips: जर तुम्ही कोर्ट मॅरेज करण्याचा विचार करत असाल तर या गोष्टींनी आपला विवाह विशेष होईल

Court Marriage Tips: भारतातील लग्नांमध्ये दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. सोबतच लग्नाचे नियोजन करताना मुलगा आणि मुलगी दोन्ही कुटुंबाच्या नाकीनऊ येतात. यात नातेवाईकांच्या लांबलचक यादीपासून ते खाण्याच्या विविधतेपर्यंत ही सर्व कामं करणे म्हणजे तारेवरची कसरत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
देशात बहुतेक जोडप्यांना असे वाटते की त्यांचं लग्न धामधुमीत व्हावं. परंतु, असे काही लोक आहेत जे साध्या पद्धतीने लग्न करू इच्छितात. आजकाल अनेक जोडप्यांना कोर्ट मॅरेज खूप आवडते. जर तुम्ही देखील त्या लोकांपैकी असाल तर खाली दिलेल्या टिप्स फॉलो करा.

कोर्ट मॅरेजचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमचा विवाह सोहळा नीट एन्जॉय करत नाही. आपली इच्छा असेल तर तुम्ही लग्नाचा धमाका करण्यासाठी सोशल मीडियावर याची घोषणा करू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही फेसबुक, इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लग्नाचे कार्ड आणि व्हिडिओ टाकू शकता. तुम्ही लाईव्ह येऊन थेट मित्र आणि नातेवाईकांसमोर लग्नाची घोषणा करू शकता.
आपण सर्वांनी पाहिले की सोनम कपूरची बहीण रिया कपूर आणि करण बूलानी यांचे लग्न अगदी साध्या पद्धतीने झाले. यानंतर मित्र आणि नातेवाईकांसाठी एक छोटी डिनर पार्टी आयोजित केली गेली. हे लग्न कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाविना पार पडले. परंतु, कपूर कुटुंबाने याचा खूप आनंद घेतला. तुमच्या आयुष्याच्या या महत्वाच्या आनंदात काही खास लोकांना सामील करून त्यांचे आशीर्वादही घ्या.
जर तुमच्या पालकांना मिरवणुकीचे विधी करायचे असतील तर तुम्ही एक छोटी मिरवणूक कोर्टापर्यंत नेऊ शकता. त्यांची इच्छा देखील यामुळे पूर्ण होईल. सोबत आपले मित्र आणि नातेवाईक या विधीमध्ये सहभागी करुन मजा करू शकतील. यासह या प्रसंगी वेगवेगळे फोटो काढणे आवश्यक आहे.
बऱ्याच जणांना वाटते की कोर्ट मॅरेजमध्ये वधु-वरासारखी वेशभुषा करता येत नाही. हा विचार खूप चुकीचा आहे. कारण, विवाहाचा आनंद आयुष्यात एकदाच घेता येतो. म्हणूनच तुम्ही त्यात तुमचे सर्व छंद पूर्ण करू शकता. ते तुमच्यासाठी संस्मरणीय बनवण्याचा प्रयत्न करा.