Wagle Ki Duniya: ‘वागले की दुनिया’ मालिकेनं पूर्ण केला 500 एपिसोडचा टप्पा; कलाकारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
‘वागले की दुनिया – नयी पीढी नये किस्से’ या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेते सुमीत राघवन यांनी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली.
सुमीत राघवन, परिवा प्रणती, भारती आचरेकर, अंजन श्रीवास्तव, चिन्मयी साळवी, शीहान कपाही यांनी या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे.
‘वागले की दुनिया – नयी पीढी नये किस्से’ या मालिकेच्या टीमनं नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'माझे वागळे शब्दाशी सखोल नाते आहे, कारण ठाण्यातील वागळे इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझ्या प्रवासाची सुरूवात झाली होती. मालिका ‘वागले की दुनिया’ सामान्य माणसाच्या दैनंदिन संघर्षांना दाखवते.'
मालिकेचे निर्माते जेडी मजेठिया आणि सोनी सबचे व्यवसाय प्रमुख श्री. नीरज व्यास यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
यावेळी सुमीत राघवन म्हणाले, ‘’500 एपिसोडचा टप्पा पूर्ण करणे हे आमच्या टीमसाठी मोठे यश आहे आणि मी यासारख्या मालिकेची निर्मिती करण्यासाठी सोनी सब टीम व जेडी मजेठिया यांचे आभार मानतो. कलाकार म्हणून पडद्यामागे देखील नाते उत्तम असणे गरजेचे असते आणि मी असे सर्वोत्तम सह-कलाकार सोबत असल्याने स्वत:ला धन्य मानतो.