Sania-Shoaib Wedding Photos : राजेशाही थाटात पार पडलं होतं सानिया-शोएबचं लग्न; घटस्फोटाच्या चर्चां सुरु असताना या वेडिंग फोटोंवर टाका एक नजर
या घटस्फोटाच्या बातमीवर दोघांनीही अधिकृतरित्या शिक्कामोर्तब केलेला नाही. पण, पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार, शोएबच्या जवळच्या व्यक्तीने या दोघांचा घटस्फोट झाल्याचं सांगितलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमीडिया रिपोर्टनुसार, 12 वर्ष संसार केल्यानंतर या दोघांनी घटस्फोट घेतला आहे. त्यांना चार वर्षाचा इजहान नावाचा एक मुलगा आहे.
पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार, या घटस्फोटाचं कारण शोएबचं अफेअर आहे. शोएब सध्या एका पाकिस्तानी अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, 2010 साली मोठ्या राजेशाही थाटात यांचा विवाह पार पडला होता. यावेळी हा सोहळा भारत पाकिस्तान दोन्ही देशांच्या वर्तमानपत्राच्या फ्रंटपेज दिसला होता.
लाल रंगाचा सुंदर पेहरावामध्ये नवरी सानिया मिर्झा फार सुंदर दिसत होती, तर शोएब काळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये दिसत होता.
सानिया आणि शोएब यांनी 12 एप्रिल 2010 रोजी विवाह केला होता. कुटुंबीयांच्या आशीर्वादाने शोएब आणि सानियाने सात जन्म एकत्र राहण्याचे वचन दिलं होतं. मात्र या नात्यामध्ये आता दुरावा आला आहे.
सानिया अलिकडे सोशल मीडियावर सतत तिच्या मुलासोबतच्या पोस्ट शेअर करत आहे. या फोटोंना 'हेच क्षण तिला संकटात लढण्याचं बळ देत आहेत', असं कॅप्शन सानिया मिर्झाने दिलं आहे.
काही दिवसांपूर्वी सानिया मिर्झाने सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली होती. सानियाच्या या पोस्टवरून शोएबसोबतच्या तिच्या नात्यामध्ये दुरावा आल्याची चर्चा सुरु झाली होती.
शोएब मलिकच्या जवळच्या व्यक्तीने याबाबत सांगितलं आहे की, सानिया मिर्झा आणि शोएब मलिक बऱ्याच काळ एकमेकांपासून वेगळे राहत होते. आता दोघांनी औपचारिकरित्या घटस्फोट घेतला आहे. पाकिस्तानी क्रिकेट संघाचा व्यवस्थापन सदस्य असलेल्या व्यक्तीने हा खुलासा केला आहे.
पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार, शोएब मलिक सध्या एका दुसऱ्या तरुणीला डेट करत आहेत. यामुळेच सानियाने शोएबपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. पण याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सानिया आणि शोएबच्या जवळच्या मित्राने सांगितलं आहे की दोघांनी घटस्फोटासाठीची प्रक्रिया सुरु केली आहे आणि दोघांनाही एकमेकांपासून वेगळे राहायचे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सानिया सध्या दुबईमध्ये आहे तर शोएब मलिक पाकिस्तानमध्ये आहे.