Aadhaar Update: घर-बसल्या तयार करा एटीएम कार्डासारखे PVC आधार; जाणून घ्या प्रक्रिया!
आधार कार्ड हे कोणत्याही भारतीय नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआतापर्यंत आधार कार्ड कागदावर छापील स्वरूपात उपलब्ध होते, परंतु आता तुम्हाला पीव्हीसी कार्डच्या स्वरूपातही आधार कार्ड मिळू शकते. हे पीव्हीसी आधार कार्ड देखरेख करणे खूप सोपे आहे, जे तुम्ही एटीएम कार्डप्रमाणे तुमच्या वॉलेटमध्ये सहज ठेवू शकता.
चला जाणून घेऊया घरबसल्या तुम्ही PVC आधार कार्ड कसे बनवू शकता..
यासाठी तुम्हाला प्रथम UIDAI या वेबसाइट uidai.gov.in किंवा resident.uidai.gov.in वर जावे लागेल.
यानंतर तुम्ही तुमचे पीव्हीसी आधार कार्ड येथून मागवू शकता. वेबसाईट वर तुम्हाला PVC आधार कार्ड असा ऑप्शन दिसेल.
वेबसाइटवर, तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक, व्हर्च्युअल आयडी क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक प्रविष्ट करावा लागेल.
PVC आधार कार्ड ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला 50 रुपये सामान्य शुल्क देखील भरावे लागेल.
यशस्वी अर्ज प्रक्रियेनंतर, PVC आधार कार्ड तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर पोहोचते.