Uorfi Javed: शॉर्ट ड्रेस-हाय हिल्स घालून पोज देत होती उर्फी जावेद; पायऱ्यांवरुन पडता पडता वाचली, पाहा फोटो...
उर्फी जांभळ्या रंगाच्या मिनी ड्रेसमध्ये दिसली. तिच्या ड्रेसची एक बाजू फुल स्लीव्ह होती आणि दुसरी बाजू नेटसह पारदर्शक होती. उर्फी पायऱ्यांवर उभी असताना पोज देत होती, त्यावेळी तिचा पाय थोडा घसरला आणि ती पडता पडता थोडक्यात बचावली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउर्फीचा हा नवा लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिच्या संपूर्ण लुकबद्दल बोलायचे झाले तर उर्फीने या लुकला लाऊड मेकअपने रंगत दिली. तिने न्यूड आय मेकअप आणि हेवी मेकअप बेससह न्यूड लिप्सिटीक शेडचा वापर केला होता.
उर्फीच्या हेअरस्टाईलबद्दल सांगायचं तर तिने साइड पार्टेड हेअरस्टाईल केली होती. ही हेअरस्टाईल तिच्या लुकला परफेक्ट दिसत होती.
उर्फीने या लुकसोबत पांढऱ्या रंगाच्या हिल्स घातली होती. उर्फीचा हा एकूणच लूक आकर्षक होता.
उर्फीबद्दल बोलायचं तर तिने अनेक मोठ्या टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. मात्र, उर्फीला अभिनयात ओळख मिळाली नाही. उर्फीने स्वत: तिला अभिनय येत नसल्याचं अनेकदा सांगितलं आहे.
उर्फीला पहिल्यांदा बिग बॉस ओटीटीमधून प्रसिद्धी मिळाली. मात्र, या शोमधील तिचा प्रवास फार मोठा नव्हता. ती शोमध्ये फक्त एक आठवडा टिकू शकली. शोमधून बाहेर काढण्यात आलेली ती पहिली स्पर्धक होती.
शोमधून बाहेर आल्यानंतर काही वेळातच उर्फी विमानतळावर दिसली. यादरम्यान उर्फीचा लूक चर्चेत आला. क्रॉप जॅकेटसह ती तिची ब्रा फ्लाँट करताना दिसली. यानंतर उर्फी चर्चेत राहू लागली, तिची प्रत्येक शैली चर्चेत राहते.