Share Market closing Bell: गुंतवणूकदारांचे मंगल! बँकिंग स्टॉक्समधील तेजीने शेअर बाजार वधारला
आजचा मंगळवारचा दिवस गुंतवणूकदारांसाठी चांगला ठरला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएचडीएफसी बँक आणि एचडीएफसी यांचे विलिनीकरण एक जुलैपासून होणार असल्याचे वृत्त आल्यानंतर बँक निफ्टी अंकांनी वधारला.
आज दिवसभरातील व्यवहार स्थिरावले तेव्हा सेन्सेक्स 446 अंकांच्या तेजीसह 63,416 अंकावर स्थिरावला. तर, निफ्टी 126 अंकांच्या तेजीसह 18,817 अंकांवर बंद झाला.
आज बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील स्टॉक्समध्ये तेजी दिसून आली. बँकिंग शेअर्समध्ये खरेदीचा जोर दिसल्याने बँक निफ्टीने 44 हजार अंकांचा टप्पा ओलांडला.
सेन्सेक्समधील 30 पैकी 27 कंपन्यांचे शेअर्स वधारले. निफ्टी 50 मधील 38 कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.
ऑटो, फार्मा, मेटल्स, रिअल इस्टेट, मीडिया, एनर्जी, ग्राहकोपयोगी वस्तू आदी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली.
ऑईल अॅण्ड गॅस आणि एफएमसीजी सेक्टरमधील शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ झाली.
आज दिवसभरात गुंतणूकदारांच्या संपत्तीत 1.44 लाख कोटींची वाढ झाली. त्यामुळे बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल 292.11 लाख कोटी इतके झाले.