PHOTO : राणा दा अन् अंजलीबाईंचा शाही थाट; पाहून म्हणाल वाह रे वाह!
झी मराठी वाहिनीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिकेतील राणादा आणि अंजलीबाई म्हणजेच, अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांची जोडी. (PHOTO : @akshayaddr/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. (PHOTO : @akshayaddr/Instagram)
काही महिन्यांपूर्वी या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी अद्यापही राणादा आणि अंजलीबाईंसाठीचं प्रेक्षकांचं प्रेम कमी झालेलं नाही. (PHOTO : @akshayaddr/Instagram)
सध्या सोशल मीडियावर ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती आपल्या नव्या फोटोशूटमुळे (PHOTO : @akshayaddr/Instagram)
काही दिवसांपूर्वी केलेल्या फोटोशूटमध्ये हे दोघंही शाही अंदाजात दिसून आले. या फोटोत अक्षयानं सुंदर लेहंगा परिधान केला असून त्यावर भरजरी ज्वेलरी परिधान केली आहे. तर, हार्दिक जोशीनं शेरवानी आणि फेटा परिधान केला आहे. या रॉयल लूकमध्ये दोघेही सुंदर दिसत आहेत. (PHOTO : @akshayaddr/Instagram)
'राणा दा' च्या भूमिकेमुळं घराघरात पोहोचलेला अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. झी मराठी वाहिनीवर सुरु झालेली नवी मालिका 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?' (Tuzhya Majhya Sansarala Aani Kay Hava) यामध्ये हार्दिक मुख्य भूमिका साकारत आहे. (PHOTO : @akshayaddr/Instagram)