Neha Dhupia Baby Shower : ‘Mom to be’ अभिनेत्री नेहा धुपीयाच्या बेबी शॉवरचे फोटो पाहिले का?
बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपीया आणि अंगद बेदी यांच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनेहाच्या डोहाळे जेवणाचा सोहळा अगदी जोरदारपणे साजरा करण्यात आला.
नेहानं आपल्या डोहाळ जेवणाचे फोटो शेअर केले आहेत. नेहा आणि अंगद या वर्षी दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत.
नेहाने जे फोटो शेअर केले आहेत त्यात अंगज आणि त्यांची मुलगीही दिसत आहे
विशेष म्हणजे नेहाच्या डोहाळे जेवणाला तिच्या मैत्रिणींनी हजेरी लावली होती.
नेहाने 10 मे 2018 मध्ये अंगद बेदीसोबत आपली लग्नगाठ बांधली होती. तर 18 नोव्हेंबर 2018 मध्ये नेहाने मुलीला जन्म दिला. त्यांच्या मुलीचं नाव मेहर असं आहे.
मिस इंडिया’ झाल्यानंतर नेहाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अनेक सिनेमात तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
नेहा विद्या बालनसोबत ‘तुम्हारी सुलू’ या सिनेमात, तर 'लस्ट स्टोरीज' या वेब सीरिजमध्येही ती झळकली होती.
अंगद बेदी हा भारताचे माजी क्रिकेटपटू बिशनसिंह बेदी यांचा पुत्र आहे. अंगद बेदीनेही काही चित्रपटांमध्ये लहान-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत.
अमिताभ बच्चन-तापसी पन्नू यांच्यासोबत तो पिंक सिनेमात दिसला होता.